Ramsar Wetland Sites in India भारतातील रामसर स्थळे

Ramsar Wetland Sites in India
भारतातील रामसर स्थळे

 

 1. रामसर स्थळे पाणथळ व दलदलीच्या प्रदेशांशी संबंधित आहेत.
  2. 2 फेब्रुवारीहा जागतिक पाणथळ दिवस आहे.
  3. रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स हा करार 1971साली झाला. इराण या देशातील रामसर या ठिकाणी झालेल्या परिषदेत वरील करार झाला. रामसर येथील परिषदेत 18 देशांनी वरील कराराला. पाणथळ व दलदलीच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी हा करार झाला.
  4. रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स हा करार भारतामध्ये 1 फेब्रुवारी 1982 रोजी अंमलात आला.
  5. रामसर सचिवालय स्वित्झर्लंड या देशातील ग्लांड या ठिकाणी आहे.
  6. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय रामसर स्थळाचा दर्जा रामसर सचिवालयामार्फत दिला जातो.
  7. डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्र मध्ये तीन रामसर पाणथळ स्थळे आहेत.
  अ. नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य ( नाशिक ) ( जून 2019 )
  ब. लोणार सरोवर ( बुलढाणा ) ( नोव्हेंबर 2020 )
  क. ठाण्याची खाडी ( ठाणे ) ( ऑगस्ट 2022 )
  8. 1974 साली रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग द्विपकल्प हे जगातील पहिले रामसर स्थळ आहे.
  9. रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या ब्रिटन ( 175 स्थळे ) या देशात असून दुसरा क्रमांक मेक्सिको ( 142 स्थळे ) या देशाचा लागतो.
  10. रामसर स्थळांचे सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला देश बोलिव्हिया आहे. ( 148000 चौकिमी )
  11. डिसेंबर 2022 पर्यंत जगामध्ये सुमारे 2400 रामसर स्थळे आहेत.
  12. डिसेंबर 2022 पर्यंत भारतामध्ये एकूण 75 रामसर स्थळे आहेत.
  13. भारतामध्ये तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रामसर स्थळांची संख्या आहे. तमिळनाडूमध्ये 14 रामसर स्थळे आहेत. ( डिसेंबर 2022 पर्यंत. )
  14. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगालमधील सुंदरबन आहे. ( 4220 चौकिमी )
  15. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ हिमाचल प्रदेश मधील रेणुका वेटलँड आहे. ( 0.2 चौकिमी )
  16. भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय भारतातील रामसर स्थळांची नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
  17. डिसेंबर 2022 पर्यंत भारतात 1326677 हेक्टर क्षेत्रावर रामसर स्थळे आहेत.
  18. पाणथळ दलदलीच्या प्रदेशाला रामसर स्थळाचा दर्जा देण्यासाठी नऊ निकषांचा विचार केला जातो.
  1. नैसर्गिक किंवा अर्ध नैसर्गिक पण दुर्मिळ पाणथळ ठिकाण.
  2. संबंधित ठिकाणी  संकटग्रस्त वन्यजीव प्रजाती असाव्यात.
  3. संबंधित पाणथळ व दलदलीच्या प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व.
  4. वन्यजीव व वनस्पतींच्या जीवन चक्रामध्ये संबंधित पाणथळाचे असलेले महत्त्व.
  5. संबंधित पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी सुमारे वीस हजार पाण पक्षांचा आढळ असावा.
  6. संबंधित पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांचा आढळ असावा.
  7. संबंधित पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी मत्स्य प्रजातींचा आढळ असावा.
  8. संबंधित पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का आढळ असावा.
  9. संबंधित पाणथळ व दलदलीच्या ठिकाणाचे महत्व.
 2. भारतातील 75 रामसर स्थळांची यादी :
  1. कोलेरु तलाव – आंध्र प्रदेश – 2022
  2. दीपोर बील – आसाम – 2002
  3. काबर्टल वेटलॅंड – बिहार – 2020
  4. खिजाडिया वन्यजीव अभयारण्य – गुजरात – 2021
  5. नळ सरोवर पक्षी अभयारण्य – गुजरात – 2012
  6. तलाव वन्यजीव अभयारण्य – गुजरात – 2021
  7. वाधवणा वेटलॅंड – गुजरात – 2021
  8. भिंडावास वन्यजीव अभयारण्य – हरियाणा – 2021
  9. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान – हरियाणा – 2021
  10. चंदरताल वेटलॅंड – हिमाचल प्रदेश – 2005
  11. पॉंग डॅम तलाव – हिमाचल प्रदेश – 2002
  12. रेणुका वेटलँड – हिमाचल प्रदेश – 2005
  13. वुलर सरोवर – जम्मू व काश्मीर – 1990
  14. होकेरा वेटलॅंड – जम्मू व काश्मीर – 2005
  15. सुरीनसर मनसार तलाव – जम्मू व काश्मीर – 2005
  16. त्सोमोरिरी तलाव – जम्मू व काश्मीर – 2002
  17. अस्थमुडी वेटलॅंड – केरळ – 2002
  18. सस्थमकोट्टा तलाव – केरळ – 2002
  19. वेंबनाड कोल वेटलॅंड – केरळ – 2002
  20. त्सो कार वेटलॅंड कॉम्प्लेक्स – लडाख – 2020
  21. भोज वेटलॅंड्स – मध्य प्रदेश – 2002
  22. लोणार सरोवर – महाराष्ट्र – 2020
  23. नांदूर मधमेश्वर – महाराष्ट्र – 2019
  24. लोकतक तलाव – मणिपूर – 1990
  25. भितरकणिका खारफुटी – ओरिसा – 2002
  26. चिल्का सरोवर – ओरिसा – 1981
  27. बियास संवर्धन – पंजाब – 2019
  28. हरीके सरोवर – पंजाब – 1990
  29. कांजळी सरोवर – पंजाब – 2002
  30. कोशोपूर मियाणी – पंजाब – 2019
  31. नांगल वन्यजीव अभयारण्य – पंजाब – 2019
  32. रोपल सरोवर – पंजाब – 2019
  33. केवलदेव घाना अभयारण्य – राजस्थान – 1981
  34. सांभर सरोवर – राजस्थान – 1990
  35. पॉइंट कॅलिमरे वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2002
  36. रुद्रसागर सरोवर – त्रिपुरा – 2005
  37. बखिरा वन्यजीव अभयारण्य – उत्तर प्रदेश – 2021
  38. हैदरपूल वेटलॅंड – उत्तर प्रदेश – 2021
  39. नवाबगंज पक्षी अभयारण्य – उत्तर प्रदेश – 2019
  40. पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य – उत्तर प्रदेश – 2019
  41. सामन पक्षी अभयारण्य – उत्तर प्रदेश – 2019
  42. समसपूर पक्षी अभयारण्य – उत्तर प्रदेश – 2019
  43. सांडी पक्षी अभयारण्य – उत्तर प्रदेश – 2019
  44. सरसाई नवर झील – उत्तर प्रदेश – 2019
  45. सूर सरोवर – उत्तर प्रदेश – 2020
  46. अप्पर गंगा नदी ( ब्रिजघाट ते नरोरा स्ट्रेच ) – उत्तर प्रदेश – 2005
  47. आसन संवर्धन क्षेत्र – उत्तराखंड – 2020
  48. पूर्व कोलकाता वेटलॅंड्स – पश्चिम बंगाल – 2002
  49. सुंदरबन वेटलॅंड – पश्चिम बंगाल – 2019
  50. कारीकिली पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  51. पल्लिकरणाई पाणथळ राजू अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  52. पिचावरम कांदळवन – तमिळनाडू – 2022
  53. पाला पाणथळ प्रदेश – मिझोराम – 2022
  54. सख्य सागर – मध्य प्रदेश – 2022
  55. कुंथनकुलम पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2021
  56. सातकोसिया घाट – ओरिसा – 2021
  57. नंदा सरोवर – गोवा – 2022
  58. मन्नार मरीन बायोस्फीअर रिझर्व्हेचे आखात – तमिळनाडू – 2022
  59. रंगनाथिटू बीएस – कर्नाटक – 2022
  60. वेंबन्नूर वेटलॅंड कॉम्प्लेक्स – तमिळनाडू – 2022
  61. वेल्लोड पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  62. सिरपूर वेटलॅंड – मध्य प्रदेश – 2022
  63. वेदांतंगल पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  64. उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  65. तांपारा सरोवर – ओरिसा – 2022
  66. हिराकुड जलाशय – ओरिसा – 2022
  67. अनसुपा सरोवर – ओरिसा – 2022
  68. यशवंत सागर – मध्य प्रदेश – 2022
  69. चित्रागुडी पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  70. सुचिंद्रम थेरुर वेटलॅंड कॉम्प्लेक्स – तमिळनाडू – 2022
  71. वडूवूर पक्षी अभयारण्य – तमिळनाडू – 2022
  72. कांजिरंकुलम पक्षी अभयारण्य तमिळनाडू – 2022
  73. ठाणे खाडी – महाराष्ट्र – 2022
  74. हायगम वेटलॅंड कंझर्व्हेशन रिझर्व्ह – जम्मू व काश्मीर – 2022
  75. शालबुग वेटलॅंड कंझर्व्हेशन रिझर्व्ह – जम्मू व काश्मीर – 2022

2 COMMENTS

Comments are closed.