RRB GROUP D QUESTION PAPER
24 August 2022
तिन्ही शिफ्टचे प्रश्न
1. जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बंगाली भाषेचा कितवा क्रमांक लागतो ?
सातवा
2. सिंधू नदी मधील किती टक्के पाण्याचा वापर भारत करतो ?
20 %
3. 1813 मध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणता कायदा आणला होता ?
पहिला चार्टर ॲक्ट
4. उत्तर भारतामध्ये मकर संक्रांत हा सण कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो ?
जानेवारी ( पौष )
5. कलम 53 कशाशी संबंधित आहे ?
संघराज्याचे कार्यकारी अधिकारी
6. कितव्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?
86 वी घटना दुरुस्ती ( 2002 )
7. भारताचे राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे आहे ?
नवी दिल्ली
8. 2022 मध्ये भारताचे पंचायतराज मंत्री कोण आहेत ?
गिरीराज सिंह
9. ॲल्युमिनियमचे धातुक कोणते आहे ?
बॉक्साइट
10. भारताने 1000 वा एक दिवशीय क्रिकेट सामना कोणत्या देशाच्या विरुद्ध खेळला ?
वेस्ट इंडीज
11. 2021 – 22 या वर्षाची भारतातील महिला सीनियर फुटबॉल चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे ?
मणिपूर
12. मार्च 2022 मध्ये स्त्री मनोरक्षा योजनेची सुरुवात कोणी केली ?
भारत सरकारचे महिला व बाल विकास मंत्रालय आणि NIMHANS, बंगळुरू
13. ब्लिचिंग पावडर व कार्बन डाय ऑक्साइड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यावर कोणता गॅस तयार होतो ?
क्लोरीन व ऑक्सिजन
14. पेट्रोलियम पदार्थ जळाल्यावर कोणता गॅस तयार होतो ?
सल्फर ऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड
15. प्रोपेनमध्ये अनुक्रमे कार्बन व हायड्रोजनचे अणू किती असतात ?
कार्बन 3, हायड्रोजन 8
16. मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले आहेत ?
अमेरिका
17. वर्ड ॲथलेटिक्स ने वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला दिला आहे ?
अंजू बॉबी जॉर्ज
18. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन कोणता घटक करतो ?
हिमोग्लोबिन
19. नुब्रा व्हॅली कोठे आहे ?
खारदंग ला, लेह ( लडाख )
20. शोक नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
सिंधू नदी
21. भारताचे किती पंतप्रधान, पंतप्रधान व्हायच्या आधी एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?
6
22. एकूण मूलद्रव्यांपैकी किती मूलद्रव्य कृत्रिम मूलद्रव्य आहेत ?
24
23. भारताने पहिली अणुचाचणी केव्हा घेतली ?
18 मे 1974, पोखरण, राजस्थान
24. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
1951
25. भारतामधील पहिला अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला होता ?
7 एप्रिल 1860 , स्वातंत्र्य मिळाल्यावर 26 नोव्हेंबर 1947.
26. भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालयाचे मुख्यालय कोठे आहे ?
नवी दिल्ली
28. भारतातील सर्वात छोटे नदीपात्रातील बेट कोणते आहे ?
बित्रा बेट व उमानंद बेट
28. इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?
कुराण
29. पर्यावरणावर प्रेम असणारा बिश्नोई संप्रदाय कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान
30. चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक कोणत्या राज्याने जिंकले आहेत ?
1. हरियाणा, 2. महाराष्ट्र, 3. कर्नाटक
31. कलकत्ता नगरपालिकेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली ?
1776 चार कायदा
32. भारतामध्ये भाषा विद्यापीठ किती आहेत ?
सहा
33. भारताचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत ?
भारताचे राष्ट्रपती
34. गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती कोठे झाली ?
बोध गया ( बिहार )
35. महेंद्र गिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे ?
ओडिशा व तमिळनाडू
36. भारतामध्ये नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे ?
रिझर्व बँक ऑफ इंडिया
37. नट्यांजली ( Natyanjali ) उत्सव तमिळनाडू राज्यामध्ये केव्हा साजरा केला जातो ?
शिवरात्रीला
38. 2022 साली झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतामार्फत सहभागी झालेला एकमेव खेळाडू कोण होता ?
आरीफ खान
39. 11 व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला ?
2002
40. ओणम हा सन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ?
केरळ
41. 2022 मध्ये इस्त्रायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ?
Yair Lapid
42. बेटवा नदी प्रामुख्याने कोणत्या राज्यातून वाहते ?
मध्य प्रदेश
43. भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो ?
13 फेब्रुवारी ( आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च )