राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) SHAHU MAHARAJ
1) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये झाला.
2) २६ जून हा शाहू महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.
3) शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते.
4) शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. शाहू महाराज तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
5) १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए.रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली.
6) शाहू महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले होते.
7) २० मार्च १८८६ रोजी शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यु झाला.
8) १८८५ ते १८८९ या काळात शाहू महाराजांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनाया महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्या कडुन मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले.
9) ८ मे १८८८ रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली.
10) १८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी धारवाड येथील एस.एम.फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहू महाराजांना एस.एम.फ्रेजर यांनी दिले.
11) १ एप्रील १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू
महारांजाचा विवाह झाला.
12) शाहु महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी
एकूण चार आपत्ये होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्यावरून पडून मृत्यू झाला.
13) १८९३ मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले.
14) २ एप्रील १८९४ रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहू महाराजांनी स्विकारली. शाहु महाराजांच्या राज्याभिषेक साहेळ्या दरम्यान ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता.
15) १८९५ मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहूपूरी ही गुळाची बाजारपेठ सुरु केली.
16) १८९६ साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम वस्तीगृह सुरु केले.
17) १८९७ साली महारोग्यांसाठी व्हिक्टोरीया लेप्रसी या हॉस्पीटलची स्थापना शाहू महाराजांनी केली.
18) नोव्हेंबर १८९९ मध्ये शाहु महाराजांच्या जिवनास कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले. शाहू महाराज पंचगंगा नदी काठी स्नानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहीत नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणुन दिले. या बाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगतीले. येतुन खऱ्या अर्थाने ब्राम्हणेत्तर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली.
19) १९०१ मध्ये शाहू महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतन जप्त केले. नारायण भट्ट सेवकरी यांच्या कडुन वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली.
20) वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगद्तगुरु शंकराचार्य यांनी ब्राम्हणांची बाजु घेतली व शाहू महाराजांवर टिका केली.
21) १६ एप्रील १९०२ रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटीश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहु महाराजांच्या बाजूने निकाल देवून शाहू महाराजांना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला.
22) राजर्षी शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
23) १९०१ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतीबंधक कायदा लागू केला.
24) १९०१ साली शाहु महाराजांनी व्हिक्टोरीया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. परंतु या बोर्डिंगमध्ये फक्त ब्राम्हण मुलेच राहु लागल्याने शाहू महाराजांनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली.
25) १८ एप्रील १९०१ रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र्य वस्तीगृहे शाहू महाराजांनी स्थापन केली.
26) २ जुन १९०२ रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या ०७ व्या एडवर्ड च्या राज्यरोहन समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाच्या वेळी केंब्रीज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी बहाल केली.
27) २६ जुलै १९०२ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव / आरक्षित ठेवल्या. आरक्षणा बाबतचा हा जाहीरनामा करवीर गॅझेट मधून प्रकाशित करण्यात आला होता.
28) १९०२ साली शाहू महाराजांनी पाटबंधारे धोरण जाहीर केले.
29) १९०५ साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्गुरुचे नवे पीठ निर्माण
करुन मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची पीठाचे प्रमुख म्हणुन नेमणूक केली. तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता पुरोहीत शाळा निर्माण केल्या.
30) १९०६ मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनींग व जिनींग मिल स्थापन केली. (२००३ मध्ये महाराष्ट्र
शासनाने ही मिल बंद केली आहे)
31) १९०६ साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरु केल्या. तर १९०७ साली शाहू महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
32) १९०७ साली कोल्हापुरच्या पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधून त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव दिले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडून करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव वसविण्यात आले.
33) १९०८ साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वस्तीगृह स्थापन केले.
34) २० मे १९११ रोजी शाहू महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.
35) १९११ साली शाहू महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी नामदेव वस्तीगृह सुरु केले.
36) ११ जानेवारी १९११ रोजी शाहु महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना केली व त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणुन नेमणुक केली. भास्कर जाधव यांचे पुस्तक घरचा पुरोहीत हे आहे.
37) १९११ च्या हुकूमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली.
38) १९१२ साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये सहकारी कायदा संमत केला.
39) १९१२-१३ साली शाहू महाराजांनी संस्थान मधील शेतकऱ्यांना शेती विषयक शिक्षण देण्याकरीता किंग एडवर्ड ॲग्रीकल्चर इन्स्टिट्युट या संस्थेची स्थापना केली.
40) १९१२ मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पाटील शाळा सुरु केल्या
41) १९१३ मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरु करुन त्याच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणूक शाहू महाराजांनी केली.
41) १९१६ साली शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क मिळवून देणे या कार्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
42) १९१७ साली विधवा पुर्नविवाहास मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी संमत केला.
43) २५ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली.
44) २१ नोव्हेबर १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. यासंबधाने पहीलीशाळा चिपरीपेटा येथे शाहू महाराजांनी सुरु केली. ( १८९३ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थानिक बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड आहेत )
45) १९१७ साली जातवार प्रतीनिधीत्वासाठी शाहू महाराजांनी भारत मंत्री लार्ड मॉन्टेग्यू यांची भेट घेतली.
त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफोर्ड या कायद्याचे स्वागत केले होते.
46) ४ मार्च १९१८ रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा शाहू महाराजांनी सुरु केली.
47) १९१८ साली शाहू महाराजांनी महार वतने, बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. तसेच आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला.
48) १९१८ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थान मध्ये तलाठी शाळा सुरु केल्या.
49) १९१८ साली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना करुन राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले.
50) १९१९ साली शाहु महाराजांनी स्त्रीयांना क्रुरपणे वागणूक देण्याच-या प्रथेविरूध्द प्रतीबंधक कायदा मंजुर केला.
51) १९२० मध्ये शाहू महाराजांनी संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला.
52) १९२० मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कुलची स्थापना केली.
53) १९२० मध्ये शाहू महाराजांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली.
54) शाहू महाराजांनी महार पैलवानांना जाट पैलवान, चांभारांना सरदार व भंग्यांना पंडीत अशा पदव्या दिल्या
होत्या. शाहू महाराजांनी कोल्हापूर नगर पालिकेच्या चेअरमनपदी दत्तोबा पवार या अस्पृश्याची नेमणूक केली होती.
55) ६ मे १९२२ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी मुंबई येथील खेतवाडी मधील पन्हाळा लॉज या बंगल्यावर शाहू महाराजांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला.
56) शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे नाव देण्यात आहे.
57) छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत.
58) डॉ आंबेडकर यांच्या मुकनायक व आगरकर यांच्या सुधारक या वृतपत्रांना शाहु महाराजांनी आर्थिक सहकार्य केले होते.
59) शाहू महाराजांनी पं. मदन मोहन मालविय यांच्या विनंतीवरुन बनारस हिंदु विश्व विद्यालयास आर्थिक सहकार्य केले.
60) थिऑसॉफिकल सोसायटी या धार्मिक संघटनेचा शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होतो.
61) शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे भारतातील पहिले रेसकोर्स स्थापन केले.
62) शाहू महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकून दिले व त्या हॉटेलला सत्यशोधक हॉटेल असे नाव दिले.
63) ब्रिटीशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतीकारी संघटना कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आली होती. शाहू महाराज हे दरवर्षी या संघटनेस ५०० रु मदत देत असत. तसेच क्रांतीकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भांडार येथून शाहू महाराज हे दरवर्षी संस्थानाचे कपडे खरेदी करत असत.
64) संस्थानच्या एकूण महसुलापैकी सहा टक्के महसूल शाहू महाराज शिक्षणावर खर्च करीत असत.
65) पहिल्या महायुद्धाच्या वेळी शाहू महाराजांनी ब्रिटीशांना २० लाख रु कर्ज दिले होते तसेच वैयक्तिक देणगीतून २० हजार रुपये दिले होते. युद्ध कामासाठी महाराज संस्थानातून महीन्याला २०० सैनिक पुरवित असत.
66) चिरोल या ब्रिटीश लेखकाच्या इंडिया अनरेस्ट या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद रा. र. डोंगरे यांच्या कडून करुन घेऊन त्या ग्रंथाच्या प्रती विकत घेऊन संस्थानमध्ये मोफत वाटल्या.
67) महाराजांनी जेष्ठ गायीका केसरबाई केरकर, बालगंधर्व, संगीतसम्राट आल्लामियाँ खान यांना राजआश्रय दिला. तसेच महाराजांनी आप्पाजी धोंडीराज मुरतुलेय या कवीसही राजआश्रय दिला.
68) शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी पदी मिस लिट्स नंरत श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणुक केली.
69) शाहू महाराजांनी कुस्त्यांकरीता कोल्हापूर येथे खासबाग मैदान तयार केले.
70) १८९३ मध्ये शाहू महाराजांनी देवल क्लबची स्थापना केली.
71) १८९५ मध्ये शाहू महाराजांनी मोतीबाग तालीमची स्थापना केली.
72) रोमन कॅथॉलिक पंथाचा ए लॉरेन्स हा शाहू महाराजांचा अंगरक्षक होता.
73) १९१२ मध्ये पैलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात शाहू महाराजांनी केली. इमाम बक्श या पहिलवानास शाहू महाराजांनी पहिली गदा दिली.
74) १९१३ मध्ये धो. रा. सुतार यांच्या कडून शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा तयार करुन घेवून शाहू महाराजांनी पन्हाळा गडावर स्थापन केला.
75) १९०५ मध्ये १५ लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करुन शाहू महाराजंनी सुत गिरणी स्थापन केली.
76) १८९५ मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान मधील शेणगाव येथे काताचा कारखाना सुरु केल.
77) १९१३ मध्ये शाहु महाराजंनी नागरी पतपेढ्यांची स्थापना केली.
78) १८९१ मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे भू-गर्भशास्त्र सर्वेक्षण केले.
79) १८९५ मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे औद्योगिक सर्वेक्षण केले.
80) १९०६ ते १९०७ मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे जल सर्वेक्षण केले.
81) शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये तांत्रिक शिक्षणाकरीता जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्युट या संस्थेची स्थापना केली.
82) शाहू महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन कोल्हापूर येथे इन्फंट्री स्कूलची स्थापना केली.
83) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंड मधील शिक्षण घेण्याकरीता शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक सहाय्य केले होते.
84) डॉ आंबेडकर यांना अमेरीकेतील कोलंबिया येथील शिक्षणा करीता सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली होती.
85) १० नोव्हेंबर १९१८ रोजी परळ (मुंबई) येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भुषविले.
86) १९१८ साली शाहू महाराजांनी नवसारी (गुजरात) येथे भरलेल्या आर्य समाजाच्या ११ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भुषविले.
87) १९ एप्रील १९१९ रोजी शाहू महाराजांनी कानपुर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रीय परीषदेच्या १३ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषविले. २१ एप्रील रोजी याच कार्यक्रमा दरम्यान शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली.
88) १९२० मध्ये शाहू महाराजांनी गुजरात मधील भावनगर येथील आर्य समाजाच्या परीषदेचे अध्यक्षपद भुषविले.
89) १९२० मध्ये शाहू महाराजांनी नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहीष्कृत परीषदेचे अध्यक्षपद भुषविले.
९०) २० मार्च १९२० रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगांव येथील दलीतांच्या परीषदेेस उपस्थित राहून डॉ आंबेडकर यांनी दलीत समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन दिले.
91) १९२० साली कर्नाटक मधील हुबळी येथे ब्राम्हणेत्तर परीषद भरविण्यात आली होती या परीषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते.
92) ब्रिटन राणी व्हिक्टोरीयाच्या वतीने शाहु महाराजांना GCSI हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला.
93) १४ मे १९०० रोजी व्हिक्टोरीया राणीच्या वाढदिवसानिमीत्ताने ब्रिटीश सरकारने शाहु महाराजांना
महाराजा ही पदवी दिली.
94) १६ एप्रील १९२० रोजी शाहू महाराजांना नाशिकच्या जनतेकडुन मानपत्रे अर्पण करण्यात आली.
95) शाहू महाराज म्हणजे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव महर्षी वि रा शिंदे यांनी केला.
96) He was king, But democratic king असे शाहू महाराजांचे वर्णन भाई माधवराव बागल यांनी केले.
97) महाराष्ट्राचा गौतमबुद्ध असे वर्णन यशवंतराव मोहीले यांनी केले.
98) उत्तरप्रदेश मधील कानपुर विद्यापीठास शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे.
99) He was a pioneer of Social Democracy असे शाहू महाराजांबद्दल उद्गार डॉ. आंबेडकर यांनी काढले.