Simple Present tense : साधा वर्तमानकाळ

Simple Present tense : साधा वर्तमानकाळ

Structure : कर्ता + क्रियापदाचे पहिले रुप  + कर्म
Subject + Verb 1 + Object
1) साध्या वर्तमानकाळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी (He,She,It, मुलाचे किंवा मुलीचे नाव) असेल तर मुख्य क्रियापदास s किंवा es हा प्रत्यय लावतात.
2) साध्या वर्तमानकाळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी (He,She,It, मुलाचे किंवा मुलीचे नाव) असेल व क्रियापदाचे शेवटचे अक्षर s, sh, ch,o,x, यापैकी कोणते तरी एक असेल तर मुख्य कियापदास es हा प्रत्यय लावतात. इतर क्रियापदांना s हा प्रत्यय लावतात.
1) pass – passes
2) push – pushes
3) catch – catches
4) go  – goes.
5) relax – relaxes

3) साध्या वर्तमानकाळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी (He,She,It, मुलाचे किंवा मुलीचे नाव ) असेल व मुख्य कियापदाच्या शेवटी Y असून त्याच्या पूर्वी व्यंजन असेल तर Y काढून टाकावे व त्याऐवजी ies घ्यावे.
1) try – tries
2) fry – fries
3) cry – cries

4) साध्या वर्तमानकाळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी (He,She,it,मुलाचे किंवा मुलीचे नाव) असेल व मुख्य कियापदाच्या शेवटी Y असून त्याच्या पूर्वी स्वर (a,e.i,o. u) असेल तर मुख्य क्रियापदास  S हा प्रत्यय लावतात.
1) play – plays
2) obey – obeys
3) stay – stays

EXAMPLES :
1) I push a ball.
2) We push a ball.
3) You push a ball.
4) You push a ball.
5) He pushes a ball.
6) She pushes a ball.
7) lt pushes a ball.
8) They push a ball.
9) Ram pushes a ball.
10) Seeta pushes a ball.

अपवाद : दिलेल्या वाक्यात कर्त्यानंतर am / is / are / has / have असेल व त्यानंतर कोणतेही क्रियापद नसेल तर ते वाक्य Simple Present Tense चे असते.
1) I am a teacher.
2) Sanjay is a student.
3) They are my best friends.
4) Savitra has a brother.
5) We have four sisters.

Simple Present Tense चे नकारार्थी वाक्य. (negative sentence )
Structure : S + don’t / doesn’t + V 1 + O
• Simple Present Tense मधील वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी (He, She, it, मुलाचे किंवा मुलीचे नाव) असेल तर doesn’t घ्यावे. इतर सर्व कर्त्यांसाठी don’t घ्यावे.
1) they don’t go to school.
2) we don’t read news paper.
3) I don’t teach science.
4) You don’t ask questions.
5) He doesn’t watch movie.
6) She doesn’t go to college.
7) it doesn’t work properly.
8) Laxman doesn’t play cricket.

Simple Present Tense चे प्रश्नार्थक वाक्य. (interrogative sentence )
Structure : Do / Does + S + V 1 + o + ?
1) Do I teach science ?
2) Does he go to school ?

• दिलेल्या वाक्यात पुढीलपैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य Simple Present Tense चे असते – usually, often, occasionally, frequently, rarely, daily, scarcely, always, generally, seldom, scarcely, never, every, hardly.

• दिलेल्या वाक्यात never, hardly, seldom, scarcely यापैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य negative sentence असते.