सोलापूर महानगरपालिका भरती 2020 लिपिक पेपर भाग 4

SOLAPUR MAHANAGARPALIKA CLERK QUESTION PAPER PART – 4

मराठी व्याकरण
सोलापूर महानगरपालिका भरती 2020
पदाचे नाव – कनिष्ठ श्रेणी लिपिक
परिक्षेचा दिनांक – 9/02/2020
————————————————————
प्रश्न क्रमांक 1 पासून 75 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

76) खालीलपैकी अनेकवचनीं शब्दाचा क्रमांक लिहा.
1) सासू      2) पिसू      3) अश्रू      4) पाखरू
77) ‘ आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ‘ या काव्यंपंक्तीचा अलंकार ओळखा.
1) रूपक      2) अनुप्रास      3) व्यतिरक       4) शलेष
78) मराठी भाषेतील प्रमुख रस किती आहेत?
1) आठ       2) सात      3) नऊ      4) पाच
79) भाषेचा आद्य घटक…. होय.
1)  वर्ण      2) शब्द      3) ध्वनी      4) वाक्य
80) स्वतंत्रपणे उच्चारता येणाऱ्या वर्णांना… म्हणतात.
2) व्यंजन      2) अर्धस्वर      3) स्वरादी      4)स्वर
81) मराठी लेखनाची लिपी कोणती आहे ?
1) संस्कृत      2) प्रकृत     3) देवनागरी     4) मराठी
82) खालील शब्दातील ‘कटक ‘या अर्थाचा शब्द ओळखा.
1) सेनापती      2) युद्ध      3) राजा      4) सैन्य
83)’सव्यापसव्य ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
1) आजूबाजूला      2) नसती उठाठेव
3) हमरीतुमरी        4) अघळपघळ
84) पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
1) आशीर्वाद   2) आशिर्वाद   3) आशिर्वाद   4) आशिर्वाद
85) कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाली?
1) भूगोल      2) घर      3) झाड      4) घोडा
पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या 87 ते 90 प्रश्नांची उत्तरे शोधा. 
आपल्या समाजात अनेक अनिष्ट प्रथा,  परंपरा वर्षानू वर्षे सुरु आहेत. कुणी उघडपणे तर कुणी अप्रत्यक्षपणे या ना त्याप्रकारे या प्रश्नाचा स्वीकार करीत असतात. ज्यांना वाईट प्रथाबद्दल चीड असते.असेल लोक त्याविरुद्ध आवाज उठवतात.पण तो विचार प्रत्यक्ष कृतीत येत नाही. याला कारण  ती एकटी व्यक्ती संपूर्ण समाजाला विरोध करू धजावत नाही. हुंड्याची प्रथा ही सुद्धा आपल्या समाजातील अनेक दृष्ट प्रथापैकी एक होय. पण आपल्या समाजातील इतर अनेक रूढीपरंपरे विरुद्ध जितकी व्यापक जागृती यापूर्वी केली गेली. तितक्या व्यापक प्रमाणावरील जनजागरण या प्रथेविरुद्ध मात्र झाले नाही.असे खेदाने म्हणावे लागते. अर्थात,  सर्व समाजाचाच या प्रथेला पाठिंबा आहे,  असे नाही. अनेकांना या प्रथेची तीव्र चीड आहे. परंतु अल्पकालीन स्वार्थ म्हणा वा अन्य काही म्हणा या प्रथेला विरोध करताना आपणा सर्वांकडून आतापर्यंत बोटचेपणा दाखविला गेला आहे.  एवढे मात्र खरे.
आपल्या समाजाला लागलेल्या या हुंडारूपी किडीमुळे हुंडाबळीची ज्वलंत समस्या आज आपल्यापुठे उभी आहे. रोज वृत्तपत्रात कुणी ना कुणी ‘ शैला लाटकर ‘ हुंड्याची बळी झाली,  अशी बातमी असते. सासरच्या मंडळींना मनाजोगत हुंडा न मिळाल्याने नवविवाहीत त्यांच्या रोषाला मानसिक वा शारीरिकदृष्टया बळी पडतात. हुंडा पद्धती ही आपल्या संस्कृतीला लागलेला कलंक आहे.
87) ज्या वाईट प्रथाबद्दल लोकांना चीड असते. तिच्याबद्दल ते लोक प्रत्यक्ष कृती का करू शकत  नाहीत?
1) त्यांच्यात धाडस नसते
2)  त्यांच्या विरोध वरवरचा असतो
3) ते चीडखोर असतात   4) ते एकाकी पडतात
88)’ हुंड्याची प्रथा ‘ आजही का सुरु आहे?
1) लोकांना हुंडा घेण्यास आवडते
2) हुंडा देण्यास आवडते
3) व्यापक जनजागरण झालेले नाही
4) या प्रथेला समाजाचा पाठिंबा आहे
89) ‘ बोटचेपेपणा दाखवणे ‘ या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता? 
1) बोटे चेपून पाहणे      2) वरवरचे धोरण ठेवणे
3) बोटे मोजणे             4) बोटे मोडणे
90) शैला लटकरचे उदाहरन कोणत्या संदर्भात घेतले आहे ?
1) शोषणाला बळी पडल्याबद्दल
2) हुंडा न मिळाल्याबद्दल
3) हुंडाबळी ठरल्याबद्दल
4) मानसिकदृष्टया बळी गेल्याबद्दल
91) योग्य पर्याय ओळखा. पाऊस आला आणि मोर थूई थुई नाचू लागला.
1) संयुक्त वाक्य           2) मिश्र वाक्य
3) केवल वाक्य           4) प्रश्नार्थक वाक्य
92) ‘बलुतं ‘या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1) प्रज्ञा पवार             2) दया पवार
3) नारायण सुर्वे         4) शंकर पाटील
93) इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक संगणकास एक विशिष्ट असा पत्ता बहाल केला जातो. त्यास… असे म्हणतात.
1) प्रोटोकॉल ऍड्रेस     2)वेब ऍड्रेस
3)डोमेन ऍड्रेस           4) ip ऍड्रेस
94) ई -कॉमर्सच्या साहाय्याने कंपनी…
1) निर्णय घेऊ शकते
2) इंटरनेट मार्फत आल्या मालाची विक्री करू शकते
3) डेटा पाठवू शकते    4) नेटवर्क तयार करू शकते
95) ई- गव्हर्नर याचा अर्थ…
1) विविध शासकीय कामासाठी माहिती तंत्रज्ञान व संगणकाचा उपयोग करून घेणे
2) सरकारी विभागांची माहिती देणे
3) इंटरनेटवरून सरकारी कामकाजाचे नियंत्रण करणे
4) सरकारी उत्पादन नागरिकांना पोहोचणे
96) Encyclopedia म्हणजे…. होय.
1) आपल्या संदर्भाचे पाठयपुस्तक    2) थिसॉरस
3) माहितीचा संदर्भ स्तोत्र
4) चालू घडामोडीविषयी हस्तपुस्तिका
97) ‘ कानडोळा करणे ‘ या वाक्याचा अर्थ काय आहे ?
1) वाऱ्यावर सोडणे           2) दुर्लक्ष करणे
3) अंत पाहणे                   4) आगीत तेल टाकने
98)…. ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे.
1) हिंदी      2) संस्कृत      3) तामिळ      4) तेलगू
99) ‘ मराठी नवं काव्याचे ‘ जनक कोणास म्हटले जाते ?
1) कुसुमाग्रज 2) नसरायण सुर्वे  3) बा.सी.मर्ढेकर 4) ग्रेस
100) ‘ एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा ‘ या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा.
1) अष्टावधानी 2) प्रसंगावधानी 3) हजरजबाबी 4) कुशल

उत्तरे

76 – 3, 77 – 2, 78 – 3, 79 – 3, 80 – 4, 81 – 3, 82 – 4, 83 – 2, 84 – 1, 85 – 3, 86 – 1, 87 – 4, 88 – 3, 89 – 2, 90 – 3, 91 – 1, 92 – 2, 93 – 4, 94 – 2, 95 – 3, 96 – 3, 97 – 2, 98 – 2, 99 – 3, 100 – 1,