सोलापूर महानगरपालिका भरती 2020 ‘लिपिक’ पेपर भाग-3

Municipal Corporation Solapur Clerk Paper

बुध्दिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण
सोलापूर महानगरपालिका भरती 2020
पदाचे नाव – कनिष्ठ श्रेणी लिपिक
परिक्षेचा दिनांक – 9/02/2020
—————————————————
प्रश्न क्रमांक 1 पासून 50 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

51) वडील व मुलगा यांच्या वयातील आजचे गुणोत्तर 1:4 आहे. तीन वर्षा पूर्वी मुलाचे वय 6 वर्ष होते तर आणखी चार वर्षांनी दोघांच्या वयाची बेरीज किती होईल?
1) 53 वर्ष      2) 46 वर्ष     3) 63 वर्ष    4) 57 वर्ष
52) एका करंडीतील फुलाचे प्रत्येकी 20, 24 व 30 फुलाचे हार केल्यास प्रत्येक वेळी अनुक्रमे 15, 19 व 25 फुले शिल्लक राहतात, तर करंडीतील फुलांची कमीत कमी संख्या किती?
1) 115      2) 120      3) 139      4) 135
53) 35 मजूर रोज 5 तास काम करून, एक काम 30 दिवसात  संपवितात. तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून, किती दिवसात संपवितील ?
1) 35     2) 21      3) 20      4) 6
54) 150 किलोग्रॅम गोळया 60%तांबे व 40% कथिल आहे, याप्रमाणे 300 किलोग्रॅम गोळ्यात कथिल किती असेल?
1) 80 किलो ग्राम      2) 60किलो ग्राम
3) 180किलो ग्राम     4) 120किलो ग्राम
55) लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी आली असल्यास, त्याच वर्षातील बालदिन कोणत्या दिवशी आला असेल ?
1) मंगळवार    2) सोमवार    3) रविवार   4) बुधवार
56)खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा 
24, 27, 32, 39, 49, 59, 72
1) 49      2) 39      3) 59      4) 27
57) एका गावातील पुरुषांची संख्या 40 टक्के आहे. त्या गावामध्ये ऐकून स्त्रियाची संख्या 1080 असल्यास पुरुष व स्त्रियांच्या संख्येमधील फरक किती ?
1) 720     2) 1800     3) 360     4) 1440
58)बुधवारी सायंकाळी 6.10 मिनिटानी सुटलेली रेल्वे गुरुवारी सकाळी 10.10 मिनिटांनी पोहचली तर गाडीने किती वेळ प्रवास केला ?
1)16 तास 20 मिनिटे 2) 4तास 3)16तास 4) 26 तास
59) तीन क्रमागत सम संख्याची बेरीज 78 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
1) 26      2) 28      3)39      4) यापैकी नाही
60) 2, 3, 4, 5 किंवा 6 ने भागले असता, प्रत्येक वेळी 1बाकी उरते,  तर अशी मोठयांत मोठी तीन अंकी संख्या कोणती ?
1) 121      2) 961      3) 973      4) 989
61) एका चौरसाचे क्षेत्रफळ 156.25 चौ.आहे. तर त्याची परिमिती किती ?
1) 12.5सेमी  2) 25 सेमी   3)125 सेमी   4) 50सेमी
62) एका दूध डेअरी मध्ये  सलग पाच दिवस 120 ली.15 ली. 170 ली.100 ली. व 160 ली. इतके दुध संकलित झाले तर सरासरी किती लिटर दूध संकलित झाले ?
1) 120 ली.   2) 130ली.    3) 140 ली.   4) 150  ली.
63) 15 डझन केळ्यांची किंमत 180 रुपये आहे,  तर 6 केळ्यांची किंमत किती?
1) 6      2) 9      3) 7      4) 12
64) एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्याला….. म्हणतात.
1) वाक्य    2) सर्वनाम    3) क्रियापद    4) केवलप्रयोगी
65) मराठी भाषेत ऐकून….. स्वर आहेत.
1) 48    2) 36    3) 25    4) 14
66) ‘त्यांच्या घरावर कौले आहेत ‘ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
1) घरा     2) कौल     3) वर     4) त्यांच्या
67) ‘ नाकापेक्षा मोती जड ‘ या म्हणीचा अर्थ ओळखा
1) मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे.
2) नोकरीपेक्षा मालक शिरजोर असणे
3) नोकर आणि मालक शिरजोर असणे
4) दोन्ही पैकी कोणीही शिरजोर नसणे
68) कंट्रोल +v चा वापर कशासाठी करतात ?
1) पेस्ट    2) कॉपी    3) स्प्रेड    4)कट
69) ऑप्टिकल फायबर वापर कशापासून तयार करतात ?
1) रेऑन    2) सिलिका    3) नायलान    4) बायर
70)’ रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत.’ या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे ?
1) आज्ञार्थ    2) विध्यर्थ    3) संकेतर्थ    5) स्वार्थ
71)’ भीतीने थरकाप उडणे’ हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता ?
1) काळजाला घरे पडणे 2) काळजाचे पाणीपाणी होने
3) काळीज उडून जाणे   4) काळजावर घाव घालणे
72) दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.कृपण
1) लुकडा     2) कंजूष     3) दयाळू     4) कपटी
73) ‘ झावळ्या ‘ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द समूह निवडा.
1) कपाशीच्या झाडीची        2) नारळाच्या झाडाची पाने
3)केवड्याच्या कणसातील धागे 4) रुईच्या झाडाची पाने
74) ‘ वायस ‘ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
1) पोपट     2) कावळा     3) गरुड     4) मोर
75) ‘दुष्काळ ‘याची फोड… अशी होते.
1) दुः + काळ 2) दुस + काळ 3) दु +काळ 4) दुष + काळ

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

उत्तरे

51- 1, 52- 1, 53-2, 54 -4, 55 -2, 56 -1, 57 -1, 58 – 3, 59 – 2, 60 – 2, 61 – 4, 62 – 3, 63 – 1, 64 – 1, 65 – 4, 66 – 3, 67 – 1, 68 – 1, 69 – 2, 70 – 3, 71 – 2, 72 – 2, 73 – 2, 74 – 2, 75 – 1,

1 COMMENT

Comments are closed.