Solapur Mahanagarpalika Recruitment Lipik Questions Paper 2
SMC 2020 Recruitment Exam is being conducted by Solapur Municipal Corporation (SMC) every year.The Recruitment process of SMC includes the written test.This model paper have previous year questions with solutions.
सामान्य ज्ञान व बुध्दिमत्ता चाचणी
सोलापूर महानगरपालिका भरती 2020
पदाचे नाव – कनिष्ठ श्रेणी लिपिक
परिक्षेचा दिनांक – 9/02/2020
———————————————————————–
प्रश्न क्रमांक 1 पासून 27 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
28.महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री कोण आहेत?
1) अजित पवार 2) एकनाथ शिंदे
3) उध्दव ठाकरे 4) अशोक चव्हाण
29.महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली?
1) 1846 2) 1847 3) 1848 4) 1849
30. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात?
1) लाॅर्ड माॅऊंटबॅन 2) लाॅर्ड रिपन
3) मेकाॅले 4) लाॅर्ड काॅर्नवालिस
31. महाराष्ट्रात खालील ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
1) पुणे 2) नाशिक 3) नागपूर 4) ठाणे
32. सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
1) बुध 2) गुरू 3) शनि 4) नेपच्यून
33. दूध टिकऊन ठेवण्यासाठी त्यातील सुक्ष्म जीवांचा नायनाट करण्यासाठी कोणत्या पध्दतीचा वापर केला जातो?
1) पाश्चरायझेशन 2) डायझेशन
3) डायलेसीस 4) अभिसरण
34.सध्या देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
1) रामनाथ कोविंद 2) डाॅ.मो. हमीद अन्सारी
3) व्यंकय्या नायडू 4) अमित शहा
35. माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती मिटर आहे?
1) 8888 2) 8858 3) 8868 4)8848
36. महाराष्ट्र विधानपरिषदेत एकूण किती सदस्य आहेत?
1) 76 2) 77 3) 78 4) 288
37. ‘काव्यफुले ‘हे पुस्तक कोणी लिहिले?
1) शिरीष पै 2) महात्मा फुले
3) नारायण सुर्वे 4) सावित्रीबाई फुले
38. कृष्णा व कोयना या दोन नदयांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?
1) नरसोबाची वाडी 2) माहुली 3) पुणे 4) कराड
39 . सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?
1) न्यायमुर्ती चंद्रचूड 2) न्यायमुर्ती शरद बोबडे
3) न्यायमुर्ती ए.डी.जोशी 4) न्यायमुर्ती गोगई
40. झारखंड या राज्याची राजधानी कोणती?
1) लखनौ 2) रांची 3) जयपूर 4) चंदीगढ
41. भारतीय राज्य घटनेचची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली?
1) 26 जानेवारी, 1947 2) 26 नोव्हेंबर, 1950
3) 26 जानेवारी,1950 4) 15 ऑगस्ट ,1947
42. ‘विजयघाट’ हे कोणाचे समाधीस्थळ आहे?
1) इंदिरा गांधी 2) लालबहादूर शास्त्री
3) पंडित नेहरू 4) मोरारजी देस
43. कोणते समाजसुधारक ‘ लोकहितवादी ‘ या नावाने ओळखले जातात?
1) पंजाबराव देशमुख 2) गणेश वासुदेव जोशी
3) गोपाळ गणेश आगरकर 4) गोपाळ हरी देशमुख
44. ‘क्रिकेट माय स्टाईल’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
1) सुनिल गावस्कर 2) रवी शास्त्री
3) नवज्योतसिंग सिध्दू 4) कपिल देव
45. एक मैदानावर कवायतीसाठी एक रांगेत जितकी मुले उभी होती, तितक्यात रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत संजय मध्यभागी उभा अहल्यास, त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी एकूण किती मुले उभी असतील?
1) 125 2) 36 3)64 4)121
46. 6, 4, 2, 1 आणि 0 यांचा एकदाच उपयोग करून, मिळणारी किमान पाच अंकी संख्या खालीलपैकी कोणती?
1) 12460 2) 01246 3) 61024 4) 10246
47. ‘जीवनरथ’ हा शब्द 65387 व ‘राजीवलोचन’ हा शब्द165243 असा लिहिल्यास ‘ नवथर’ हा शब्द कसा लिहावा?
1) 3578 2) 3875 3) 5387 4) 8357
48. एका सांकेतिक भाषेत ‘135’ ही संख्या 1925 अशी लिहितात, ‘256’ ही संख्या 42536 अशी लिहितात, तर त्याच भाषेत ‘241’ ही संख्या कशी लिहाल?
1) 1461 2) 4116 3) 1416 4) 4161
49. गटात न बसणारे पद ओळखा.
1) पंकज 2) मनोज 3) निरज 4) सरोज
50. आनंद स्वानंदपेक्षा जलद धावतो. मनीष आनंदापेक्षा हळू धावतो. तर तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान धावणारा कोण असेल?
1) आनंद 2) स्वानंद 3) मनीष 4) मनोज
उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
*उत्तरे*
28 – 2 , 29 – 3 , 30 – 2 , 31- 3, 32 – 2, 33 – 1,
34 – 3, 35 – 4, 36 – 3, 37 – 4, 38 – 4, 39 – 2,
40 – 2, 41 – 3, 42 – 2, 43 – 4, 44 – 4, 45 – 4,
46 – 4, 47 – 1, 48 – 4 , 49 – 2, 50 – 2