मराठी व्याकरण राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 औरंगाबाद पोलीस भरती परीक्षा दिनांक : 18 एप्रिल 2017

मराठी व्याकरण
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14
औरंगाबाद पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 18 एप्रिल 2017
—————————————————————–
1 ते 40 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

41. सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. या वाक्यातील अधोरेखित भागसाठी कोणता आलंकारिक शब्द योग्य आहे.
1) द्राविडी प्राणायाम
2) भीष्मप्रतिज्ञा
3) घाण्याचा बैल
4) भगीरथ प्रयत्न
42. बरोबर असणारी जोडी ओळखा.
1) अत्यंत धनवान व्यक्ती – इंद्र
2) भांडणे लावणारा – भांडखोर
3) उपवास पडणे – थंडा फराळ
4) वयस्कर व्यक्ती – हिरवे पाण
43. ‘मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व’ या शब्दसमुहाबादल एक शब्द निवडा.
1) तंत्र
2) मंत्र
3) सूत्र
4) यंत्र
44. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आहे ?
1) ऋ – ऌ
2) ओ – औ
3) क्ष – ज्ञ
4) प – श
45) मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता?
1) ऋ
2) ह
3) ळ
4) ख
46) ‘निष्फळ’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह सांगा.
1) निः + फळ
2) नि + फळ
3) नी + फळ
4) निश् + फळ
47. सच्छिष्य  या शब्दाची फोड करा.
1) सत् + छिष्य
2) सत् + शीष्य
3) सत् + शिष्य
4) सच् + शिष्य
48. ‘चिदानंद’ या सामासिक (जोड) शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.
1) चिद् + आनंद
2) चिदा + आनंद
3) चित् + आनंद
4) चित्ः + आनंद
49. चालणे हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार सांगा.
1) धातुसाधित
2) भाववाचक
3) सामान्यनाम
4) विशेषनाम
50. त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखा.
1) पुल्लिंग
2) नपुंसकलिंग
3) उभयलिंग
4) स्त्रीलिंग

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
41 – 4, 42 – 3, 43 – 3, 44 – 3, 45 – 3,

46 – 1, 47 – 2, 48 – 3, 49 – 1, 50 – 4