अंकगणित Maths राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 औरंगाबाद पोलीस भरती परीक्षा दिनांक : 18 एप्रिल 2017

अंकगणित Maths 40 प्रश्न
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14
औरंगाबाद पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 18 एप्रिल 2017
—————————————————————–
1 ते 60 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

61. 135/42 या संख्येचे दशांश रुप खालीलपैकी कोणते ?
1) 3.2142857
2) 3.2144
3) 3.2148
4) 3.214
62. 15/34 च्या गुणाकार व्यस्त संख्येस 10/51 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची गुणाकार व्यस्त संख्या कोणती ?
1) 10/51
2) 150/1734
3) 34/15
4) 1734/150
63. 3475 च्या नंतर येणारी 5 वी सम संख्या व 8 वी सम संख्या यांच्या बेरजेतील शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीत किती फरक आहे ?
1) 893
2) 610
3) 830
4) 200
64. 1591 च्या मागील 6 वी सम संख्या व 1040 नंतर येणारी 6 वी विषम संख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे ?
1) 27
2) 23
3) 13
4) 17
65. 3892 च्या मागील 10 व्या विषम संख्येची दुप्पट किती ?
1) 1744
2) 7674
3) 7646
4) 7746
66. 15,12,7,19,21,8,17,13,12,19,14 आणि X यांची सरसरी 15 येत असेल तर X ची किंमत किती ?
1) 20
2) 21
3) 22
4) 23
67. तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे. व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती ?
1) 45
2) 38
3) 46
4) 60
68. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्षे असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्षे आहे. मुले व मुली यांचे सरासरी वय 16 वर्षे असून मुलांची संख्या 30 आहे. तर मुलींची संख्या किती ?
1) 30
2) 15
3) 60
4) 16
69. रोमन संख्येमध्ये (X + V) + (X + V) = ?
1) XIV
2) XX
3) XVX
4) XXX
70. पुढील संख्या अक्षरात लिहा : 7042500007
1) सात अब्ज चारशे पंचवीस हजार सात
2) सातशे चार कोटी पंचवीस हजार सात
3) सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात
4) सात अब्ज चार लक्ष पंचवीस हजार सात
71. अंकात लिहा : पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा.
1) 51611715
3) 51712715
2) 5171211700154
4) 5171211715
72. सहा अंकी एकूण संख्या किती आहेत ?
1) 900000
2) 999999
3) 90000
4) 99999
73. ‘सात लक्ष सात’ ही संख्या अंकात लिहतांना एक शून्य कमी दिला तर उत्तर कितीने चुकेल.
1) 6300000
2) 6300
3) 63000
4) 630000
74. 1 ते 100 मधे 5 हा अंक किती वेळा घेतो ?
1) 17
2) 18
3) 19
4) 20
75. दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती ?
1) 80
2) 81
3) 92
4) 72
76. 1 ते 100 मध्ये एकूण मूळसंख्या किती आहेत ?
1) 25
2) 15
3) 35
4) 30
77. 1 ते 100 मधे 1 हा अंक नसलेल्या संख्या किती आहेत ?
1) 70
2) 80
3) 90
4) 72
78. 1 ते 100 मधे 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात ?
1) 21 व 20
2) 20 व 21
3) 19 व 20
4) 20 व 19
79. दोन अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो ?
1) 17
2) 18
3) 19
4) 20
80. 98901 मध्ये किती मिळवल्यास 6 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल.
1) 1001
2) 1111
3) 1099
4) 1109
81. खालीलपैकी अचुक बेरीज असलेला पर्याय कोणता ?
1) 384828 + 102030 = 487858
2) 293851 + 204030 = 407881
3) 199998 + 222222 = 312222
4) 493959 + 101010 = 594969
82. पंच्याहत्तर हजार एकशे दोन + तीन लक्ष सदोतीस + नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीस = ?
1) तेरा लक्ष पन्नास हजार एकशे एकोणसाठ
2) बारा लक्ष पन्नास हजार एकशे शहान्नव
3) तेरा लक्ष एकशे एकोणचाळीस
4) यापैकी नाही
83. साडे नऊ हजार + पावणे एकोणावीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार = ?
1) 87750
2) 87500
3) 87000
4) 87250
84. सात अंकी सर्वात लहान विषम संख्येमध्ये पाच अंकी सर्वात मोठी सम संख्या मिळविल्यास कोणती संख्या मिळेल ?
1) 1099998
2) 1199999
3) 9999118
4) यापैकी नाही
85. 75900016990000 = ?
1) 1400000
2) 400001
3) 1690000
4) 600001
86. 857013495217 = ?
1) 316796
2) 361976
3) 316976
4) 361796
87. 5 पैसे रूपयामध्ये कसे लिहितात ?
1) 0.50 रूपये
2) 0.005 रूपये
3) 0.15 रूपये
4) 0.05 रूपये
88. 36 मि.मी. = किती सेमी
1) 3.6
2) 0.36
3) 0.036
4) 36
89. बेरीज करा : 32.160 + 52.986 + 7.3
1) 92.005
2) 92.447
3) 92.464
4) यापैकी नाही
90. मारियाची उंची मागील वर्षी 1.35 मीटर होती, यावर्षी मारियाची उंची 1.42 मीटर आहे. तर एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली ?
1) 0.7 मीटर
2) 0.07 मीटर
3) 0.007 मीटर
4) यापैकी नाही
91. 1.5 + 0.005 = ?
1) 1.550
2) 1.55
3) 1.505
4) 1.5005
92. साडेबारा किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
1) 1250 ग्रॅम
2) 12050 ग्रॅम
3) 12005 ग्रॅम
4) 12500 ग्रॅम
93. 40 हेक्टोग्रॅम = किती किलो ग्रॅम
1) 400 कि.ग्रॅ
2) 40 कि.ग्रॅ.
3) 4 कि.ग्रॅ
4) यापैकी नाही
94. अनाथालयातील एका मुलास अर्धा कि.ग्रॅ मिठाई याप्रमाणे 40 मुलांना मिठाई वाटली. 220 रूपये किलो या दराने एकुण किती खर्च झाला ?
1) 2200
2) 3300
3) 2233
4) 4400
95. एका पोत्यात 35 कि.ग्रॅ गहू होता. अशा 60 पोत्यातील गहू एकत्र केला व 50 कि.ग्रॅ वजन मावणाऱ्या पोत्यांमध्ये भरला तर सर्व गहू 50 कि.ग्रॅ च्या किती पोत्यात भरला जाईल ?
1) 42
2) 52
3) 62
4) 72
96. एका ट्रकमध्ये 375 रीम कागद चढविले त्यापैकी पारगावात 2500 दस्ते कागद उतरविले व उरलेले कागद खालापुर येथे उतरविले तर खालापुरात एकूण किती रीम कागद उतरविले ?
1) 150
2) 320
3) 250
4) 300
97. एका तिजोरीत एकूण 1734 रूपये आहेत. ती सर्व नाणी आहेत. त्यातील 50 पैसे, 1रु, 2 रू, व 5 रू ची नाणी समान संख्येत आहेत तर त्यातील 50 पैशांची एकूण नाणी किती ?
1) 24
2) 240
3) 204
4) 816
98. द.सा.द.शे. 12 दराने एका मुद्दलिचे 3 वर्षांचे सरळ व्याज 5040 रूपये आहे, तर मुद्दल किती ?
1) 17000
2) 16000
3) 15000
4) 14000
99. एका चौरसाकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपन घालावयाचे आहे. 8 रूपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती रूपये खर्च यईल ?
1) 730
2) 640
3) 80
4) 200
100. 4 से.मी. बाजु असणारा चौरस व 6 सेमी लांबी व 3 सेमी रूंदी असणारा आयत या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज किती असेल ?
1) 16 चौ से.मी
2) 18 चौ से.मी.
3) 34 चौ से.मी.
4) यापैकी नाही

उत्तरे
61 – 1, 62 – 2, 63 – 3, 64 – 2, 65 – 4, 66 – 4,
67 – 4, 68 – 1, 69 – 4, 70 – 3, 71 – 4, 72 – 1,
73 – 4, 74 – 4, 75 – 4, 76 – 1, 77 – 2, 78 – 1,
79 – 3, 80 – 3, 81 – 4, 82 – 4, 83 – 2, 84 – 4,
85 – 4, 86 – 4, 87 – 4, 88 – 1, 89 – 4, 90 – 2,
91 – 3, 92 – 4, 93 – 3, 94 – 4, 95 – 1, 96 – 3,
97 – 3, 98 – 4, 99 – 2, 100 – 3.