TAIT EXAM INFORMATION

TAIT EXAM INFORMATION
TAIT परीक्षेसंदर्भातील माहिती

TAIT परीक्षा कोणाला देता येते :
D. Ed. झाल्यानंतर इ. १ ते ५ वी साठी TET Paper. 1 ( शिक्षक पात्रता परीक्षा ) देता येते.
D. Ed + Graduation असेल तर इ. ६ वी ते ८ वी साठी TET paper.2 ( शिक्षक पात्रता परीक्षा ) देता येते.

B. Ed. झाल्यानंतर इ. ६ ते ८ वी साठी TET Paper – 2 ( शिक्षक पात्रता परीक्षा ) देता येते.

B. Ed झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा १ ते ५ साठी TET Paper 1 देता येतो.  ( 2021 TET  शिक्षक पात्रता परीक्षा नुसार)

इ. ९ वी ते १२ वी साठी TET ची गरज नाही.

इ. ९ वी ते १० वी साठी मात्र B. Ed. झालेले उमेदवार थेट TAIT देऊ शकतात.

११ वी  ते १२ वी साठी M.A Bed / M.sc .Bed / M.com Bed आवश्यक आहे.

TAIT मधील मेरीटनुसार जि प शाळा, नगरपालिका/ महानगरपालिका, खाजगी अनुदानित संस्थांमधील रिक्त जागांवर मुलाखत / मुलाखतीविना नियुक्त होतात.

थोडक्यात माहिती :

D. Ed  झालेल्यांना नोकरीसाठी TET /CTET उत्तीर्ण + TAIT मेरिटसह उत्तीर्ण अट

B.Ed साठी इ. ६ वी ते ८ वी   साठी TET/CTET + TAIT मेरिटसह
इ.१ ते ५ वी साठी TET/CTET + TAIT मेरिटसह

इ. ९ वी ते १२ वी साठी फक्त TAIT मेरीटसह उत्तीर्ण आवश्यक ( TET शिक्षक पात्रता परीक्षा आवश्यक नाही)