तलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम Talathi Syllabus, Clerk Syllabus

तलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम
Talathi Syllabus, Clerk Syllabus

तलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. वरील तिन्ही पदांच्या लेखी परीक्षेत पाच विषयांवर प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी या पाच विषयांवर प्रश्न विचारले जातात. कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारावेत याचे प्रमाण निश्चित नाही.

तलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणावर साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. इंग्रजी व्याकरणावर सुध्दा साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान या घटकावर सुध्दा साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी या विषयांवर सुध्दा साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. तलाठी या पदाच्या लेखी परीक्षेत बुध्दिमत्ता चाचणी या विषयावर साधारणतः 17 ते 18 प्रश्न विचारले जातात, तर अंकगणित या विषयावर साधारणतः 7 ते 8 प्रश्न विचारले जातात.

Syllabus of English Grammar :
Parts of speech, Gender, Number, Case, Tense, Change The Voice, Direct Indirect Speech, Degree, Article, Preposition, Types of Sentences, Clauses, Figure of Speech, Modal Auxiliary, Word Building, Synthesis, Transformation, Add Question Tag, Synonyms / Similar Words, Antonyms / Opposite Words, One Word Substitution, Idiom, Proverbs, Phrases, Correct Spelling, Young Ones of Animals, Homes of Animals, Cries of Animals

मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम :
मराठी भाषेची उत्पत्ती व विकास, संत साहित्य, वर्णमाला, संधी,  लिंग, वचन, विभक्ती, शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, समास, शब्दसिध्दी, शब्दांच्या शक्ती, काव्याचे रस, वृत्त, अलंकार, विरामचिन्हे, समानार्थी शब्द, विरूध्दार्धी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमुहाबद्दल एक शब्द, साहित्यिक व टोपननावे, ध्वनीदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, अलंकारिक शब्द, शुद्ध शब्द.

सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यासक्रम :
चालू घडामोडी : महाराष्ट्रातील, भारतील व जागतिक चालू घडामोडी. महाराष्ट्रातील चालू घडामोडी वर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात.

इतिहास : भारताचा इतिहास ( विशेषत: आधुनिक भारताचा इतिहास ), महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2 – 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 1 – 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात.

भूगोल : महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भौतिक भूगोल. सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोल वर विचारले जातात. भौतिक भूगोल वर 1 – 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात.

भारतीय राज्यघटना : राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्याचे मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था / न्यायमंडळ, नियंत्रक व महालेखापरीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, महान्यायवादी, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, घटनादुरुस्ती. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे या तीन घटकांवर हमखास प्रश्न विचारले जातातच.

पंचायत राज : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळ.

मुलकी प्रशासन : प्रशासकीय विभाग, जिल्हा, प्रांत / उपविभाग, तालुका, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल.

बुध्दिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम :
अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, पाय व डोके, नाणी व नोटा, गुण व नेम, काप व तुकडे, रोपटे लावणे, आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.

अंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम :
संख्यांची किंमत, संख्यांचा लहान मोठेपणा, विभाज्यतेच्या कसोट्या, संख्यांचे प्रकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, शेकडेवारी, नफा व तोटा, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, मसवि व लसावि, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, चलन, काळ, अंतर व वेग, काळ व काम, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, घतांक, महत्वमापन.

1 COMMENT

Comments are closed.