Tax Assistant, Gr.-C (Main) Examination syllabus

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (मुख्य) परीक्षा

Tax Assistant, Gr.-C (Main) Examination

परीक्षा योजना

प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन. एकूण गुण – २००

पेपर क्र.१ ( सर्व पदांचा संयुक्त पेपर) – १०० गुण, ( मराठी ६० गुण, इंग्रजी ४० गुण ), मराठीचा दर्जा – बारावी, इंग्रजीचा दर्जा – पदवी, कालावधी – एक तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, प्रश्न संख्या- १००,

पेपर क्र.२ (स्वतंत्र पेपर) – १०० गुण, ( सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधिचे / विषयासंबंधीचे ज्ञान )
दर्जा – पदवी, कालावधी – एक तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, प्रश्न संख्या- १००, माध्यम – मराठी व इंग्रजी

पेपर क्रमांक – १ चा अभ्यासक्रम

१. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

२. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

पेपर क्रमांक – २ चा अभ्यासक्रम

१. नागरिकशास्त्र – राज्य व्यवस्थापन ( प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).

२. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदक तत्वे – शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

३. पंचवार्षिक योजना

४. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

५. बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य
बुध्दिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
मूलभूत गणितीय कौशल्य – basic numeracy / numerical skill – numbers and their relations, orders of, magnitude, etc. ( दर्जा – दहावी )

६. अंकगणित – गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा व तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी.

७. पुस्तपालन व लेखाकर्म (Book-keepings and Accountancy) – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद
पध्दतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द,  सहायक पुस्तके, खतावणी, बैंक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तिय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती.
Book keepping meaning and definition, Accounting terminology, Fundamentals of double entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, bank Reconciliation statements. Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations,

८. आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्र्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ
आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे
भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT.