24 एप्रिल ते 30 एप्रिल : जागतिक लसीकरण आठवडा World Immunization Week 2020

24 एप्रिल ते 30 एप्रिल : जागतिक लसीकरण आठवडा

World Immunization Week 2020

               “व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल” या संकल्पनेखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत “जागतिक लसीकरण आठवडा” पाळला जात आहे.
लसीकरणाच्या अंतर्गत 25 विविध संक्रामक घटक किंवा आजारांपासून संरक्षण दिले जाते. 2012 साली झालेल्या WHO च्या जागतिक आरोग्य सभेच्या बैठकीदरम्यान जागतिक लसीकरण आठवडा पाळण्याला मान्यता दिली गेली.
2012 साली मे महिन्यात स्वीकारलेली जागतिक लस कृती योजना (GVAP) जागतिक आरोग्य संघटनेच्या 194 सदस्य राज्यांमध्ये अंमलात आणली जात आहे. GVAP योजना लसीकरणाला जगभरात प्रवेश देऊन वर्ष 2020 पर्यंत लस-प्रतिबंधात्मक रोगांपासून लक्षावधी मृत्युला आळा घालण्याच्या उद्देशाने आहे.
या मोहिमेचे मुख्य ध्येय म्हणजे जीवनात संपूर्ण लसीकरणाच्या महत्त्वासंदर्भात आणि 2030 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात भूमिकेविषयी जनजागृती निर्माण करणे हे आहे.
‌     जगभरातल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि समुदायांसाठी असलेल्या लसीचे महत्त्व दर्शविणे ही यावर्षीच्या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. मोहिमेच्या माध्यमातून लसीकरणात गुंतवणूक वाढवून त्याच्या प्रमाणात वाढ करणे आणि त्यामधली तफावत कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
जगभरात सर्व वयोगटातल्या लोकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लस वापरली जाते. लसीकरण हा जगातला सर्वात यशस्वी कार्यक्रम आहे. आज देखील जगात लसीकरणापासून वंचित जवळपास 20 दशलक्ष मुले आहेत. मात्र अजूनही, गोवर, रूबेला आणि माता आणि धनुर्वात अश्या रोगांच्या बाबतीत लक्ष्य पूर्ण करण्यास जग मागे आहे. त्याउलट, ज्या देशांनी उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रगती केली आहे किंवा पुढे चालू ठेवलेली आहे, त्यांना त्या प्रयत्नांना टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
1995 साली भारत सरकारने पल्स पोलिओ कार्यक्रम सुरू केला. भारतामध्ये सर्वप्रथम 1995 साली पोलिओ विरुद्ध तोंडी लसीचा पहिला डोस देण्यात आला.
गर्भवती महिलांना टी टी 1, टी टी 2 व टी टी बुस्टर या लसी दिल्या जातात. शिशुंना पुढील लसी देतात – बीसीजी, हेपॅटिटीस, ओपीव्ही-ओ, ओपीव्ही – 1,2, व 3, डीटीपी – 1, 2 व 3, हेपॅटीटीस B – 1,2 व 3, गोवर, व्हिटामिन ए (1st डोस). बालकांना पुढील लसी देतात – डीटीपी बूस्टर, ओपीव्ही बूस्टर, व्हिटामिन ए (दुसरा ते नववा डोस), डीटीपी बूस्टर व टीटी. या सर्व लसी शासना मार्फत मोफत दिल्या जातात. शिशु, मुले आणि गर्भवती महिलांसाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक (एनआयएस) ठरलेले असते. याच वेळापत्रकानुसार लसीकरण केले जाते.