मराठी व्याकरण Marathi Grammar यवतमाळ जिल्हा पोलीस भरती Yavatmal Police Bharti परीक्षा दिनांक 28 मे 2017

मराठी व्याकरण Marathi Grammar
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती
Yavatmal Police Bharti
परीक्षा दिनांक 28 मे 2017
——————————————————————–

1 ते 25 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

26. दिलेल्या शब्दाची जात ओळखा : आयोग
1) नाम
2) क्रियाविशेषण अव्यय
3) विशेषण
4) शब्दयोगी अव्यय
27. “या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.” दिलेल्या वाक्यात अधोरेखीत केलेल्या शब्दाचा प्रकार सांगा.
1) भाववाचक नाम
2) विशेषनाम
3) धातुसाधित नाम
4) सामान्य नाम
28. पुढे दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा : “ससेमिरा लावणे”
1) नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
2) नको असलेली गोष्ट सफाईने टाळणे
3) सतत प्रयत्नशील असणे
4) अतिशय भेकडपणे वागणे
29. पुढील वाक्यातील अधोरेखीत केलेल्या अव्ययाचा प्रकार ओळखा : “तो वारंवार रजेवर असे.”
1) उभयान्वयी अव्यय
2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय
4) केवलप्रयोगी अव्यय
30. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत ?
1) पाच
2) सहा
3) आठ
4) नऊ
31. “मी पत्र लिहीत असेन.” दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.
1) साधा भविष्यकाळ
2) रिती भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ
4) अपूर्ण भविष्यकाळ
32. पुढील वाक्याचा काळ ओळखा : “तो नेहमीच लवकर येत असतो.”
1) साधा वर्तमानकाळ
2) अपूर्ण वर्तमानकाळ
3) पूर्ण वर्तमानकाळ
4) रिती वर्तमानकाळ
33. पुढे दिलेल्या शब्दांची जात ओळखा : वर, खाली, पुढे, मागे
1) विशेषण
2) उभयान्वयी अव्यय
3) केवलप्रयोगी अव्यय
4) शब्दयोगी अव्यय
34. ‘चाकूमुळे’ या शब्दामध्ये ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे ?
1) उभयान्वयी
2) केवलप्रयोगी
3) क्रियाविशेषण
4) शब्दयोगी
35. खालीलपैकी शुध्द शब्दयोगी अव्यय ओळखा.
1) कुत्रासुध्दा
2) घराबाहेर
3) गावोगावी
4) मांडवाखाली
36. शब्दयोगी अव्ययासंबंधी  पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा.
अ) शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे.
ब) शुध्द शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.
क) शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात.
ड) ‘च’, ‘मात्र’, ‘ना’ ही सर्व शब्दयोगी अव्यय स्थलवाचक आहेत.
1) फक्त अ
2) फक्त ड
3) फक्त क आणि ड
4) फक्त ब आणि क
37. सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरूध्द ही शब्द योगी अव्यय कोणत्या प्रकारची आहेत.
1) नामसाधित शब्दयोगी अव्यये
2) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यये
3) धातूसाधित शब्दयोगी अव्यये
4) क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यये
38. ‘किंवा’, ‘अथवा’, ‘की’ या सर्व उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
2) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
4) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
39. पुढे दिलेल्या शब्दाचा विरूध्द लिंगी शब्द ओळखा : हंस
1) हंसी
2) हंसा
३) हंसीण
4) हंसिका
40. ‘चढ’ या क्रियापदाच्या रुपात लिंग, वचन, व पुरुष यानुसार झालेल्या बदलांचा योग्य पर्याय ओळखा.
1) चढतो , चढतात, चढतोस
2) चढ, चढेल, चढतात
3) चढलो, चढले, चढतात
4) चढते चढतात, चढले
41. मराठी भाषेतील “लिंगाबद्दल” पुढीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत.
अ) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित व  धरसोडीची आहे.
ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.
क) प्राणी मात्रांचे लिंग वास्तविक असे नसते.
ड) निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक नसते.
1) फक्त अ
2) फक्त अ व क
3) फक्त ब आणि ड
4) फक्त अ आणि ब
42. जगन्नाथ या शब्दाचा संधी विग्रह करा.
1) जगन् + नाथ
2) जग् + नाथ
3) जगत् + नाथ
4) जग + नाथ
43) शब्दच्छल या शब्दाचा संधी विग्रह कशा प्रकारे होईल ?
1) शब्द + छल
2) शब्द + चल
3) शब्द + सल
4) शब्द + च्छल
44. देवालय हा शब्द कोणत्या संधी प्रकारामध्ये येतो ?
1) विसर्गसंधी
2) स्वरसंधी
3) व्यंजनसंधी
4) विशेषसंधी
45. जोडाक्षर = —————–
1) दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर
2) अक्षर + अक्षर
३) स्वर + व्यंजन
4) व्यंजन + व्यंजन
46. पुढे दिलेले वाक्य नवीन कर्मणी प्रयोगाच्या स्वरुपात लिहा. उदा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी.
1) विद्यार्थी शिस्त पाळतात.
2) विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी.
3) विद्यार्थी शिस्त पाळतील.
4) विद्यार्थ्यांकडून शिस्त पाळली जावी.
47. पुढील पैकी कोणते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे आहे ?
1) गाय गुराख्याकडून बांधली जाते.
2) त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने.
3) शिक्षक मुलांना शिकवितात.
4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे.
48. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?
1) प्रथमा विभक्ती
2) द्वितीया विभक्ती
3) तृतीया विभक्ती
4) चतुर्थी विभक्ती
49. ‘माणूस जातो, त्याची किर्ती मागे उरते’ या वाक्याचे रुपांतर मिश्र वाक्यात करा.
1) माणूस गेला तरी त्याची किर्ती मागे उरते
2) माणूस आतो, किर्ती उरते
3) किर्ती उरली, माणूस उरला
4) यापैकी काहीही नाही
50. ‘तू फार चतूर आहेस.’ या  वाक्याचा प्रकार ओळखा.
1) आज्ञार्थी वाक्य
2) उद्गारार्थी वाक्य
3) विधानार्थी वाक्य
१) प्रश्नार्थी वाक्य

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

उत्तरे
26 – 1, 27 – 3, 28 – 1, 29 – 3, 30 – 2, 31 – 4,
32 – 4, 33 – 4, 34 – 4, 35 – 1, 36 – 4, 37 – 2,
38 – 3, 39 – 1, 40 – 1, 41 – 4, 42 – 3, 43 – 1,
44 – 2, 45 – 1, 46 – 4, 47 – 1, 48 – 1, 49 – 1,
50 – 3.