अंकगणित 25 प्रश्न Maths यवतमाळ जिल्हा पोलीस भरती Yavatmal Police Bharti परिक्षा दिनांक 28 मे 2017

अंकगणित 25 प्रश्न Maths
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती
Yavatmal Police Bharti
परिक्षा दिनांक 28 मे 2017
——————————————————————–
1 ते 75 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

76. सायंकाळी 5.30 वाजता अब्दुलने शाळेतून सुर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. 4 कि.मी. नंतर उजवीकडे वळून 3 कि.मी. चालून घरी पोहोचला तर शाळेपासून घराचे अंतर किती ?
1) 7 कि. मी.
2) 1 कि.मी.
3) 5 कि.मी.
4) 3.5 कि.मी.
77. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
3/4, 5/8, 7/12, 16/29, 13/16
1) 3/4 >13/16
2) 7/12 > 5/8
3) 5/8 < 3/4
4)16/29 > 7/12
78. एका सर्वात मोठ्या चार अंकी संख्येस 12, 15, 18, 27 या संख्यांनी नि:शेष भाग जातो तर ती संख्या कोणती ?
1) 9720
2) 9510
3) 8725
4) 7930
79. एका पेरूची किंमत 5 रु, एका आंब्याची किंमत 7 रू होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरीता एकूण 38 रूपये खर्च केले तर त्याने किती आंबे खरेदी केले ?
1) 2
2) 3
3) 4
4) 5
80. रविच्या घरी कोंबड्या आणि गायी आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या 48 आणि एकूण पायांची संख्या 140 तर यात आणखी 10 कोंबड्या आणल्यास रविच्या घरी एकूण कोंबड्या किती होतील ?
1) 36
2) 26
3) 22
4) 32
81. एका मैदानात रविवारी सरासरी येणाऱ्या खेळाडूंची संख्या 510 आहे, आठवड्यातील इतर दिवशी सरासरी 240 खेळाडू येतात, तर माहे एप्रिल 2017 मध्ये सरासरी प्रत्येक दिवशी किती खेळाडू मैदानात येतील ?
1) 285
2) 276
3) 280
4) 286
82. पती, पत्नी व 5 वर्षाच्या मुलाच्या वयांची सरासरी 21 वर्षे आहे. 5 वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय 2 वर्षे आहे, तर सद्य स्थितीत या परिवाराच्या वयाची सरासरी किती ?
1) 22.5
2) 20
3) 21.5
4) 22
83. एक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लीटर दुध विकत घेतले असता त्यात किती लीटर शुध्द दूध मिळेल ?
1) 20 लीटर
2) 26 लीटर
3) 16 लीटर
4) 22 लीटर
84. x या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळविली असता x हिच संख्या मिळते, तर X = ?
1) 300
2) 400
3) 100
4) 75
85. एका बॅट्समनने 110 धावा काढल्या, त्यापैकी 3 चौकार आणि 8 षटकार होते, तर धावून काढलेल्या धावांच्या संख्येची टक्केवारी किती ?
1) 55 %
2) 45 %
3) 45.45 %
4) 55.55 %
86. निलेशने एक घड्याळ विकल्यास 25 टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरीदाराने निलेश ला 500 रू. ची नोट दिल्यानंतर निलेशने बाकी 125 रुपये परत केले, तर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली ?
1) 300
2) 375
3) 350
4) 625
87. एका वस्तीगृहामध्ये 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसानंतर यातील 25 विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल ?
1) 42
2) 52
3) 45
4) 35
88. काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लावतात. कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
1) 10
2) 15
3) 5
4) 7.5
89. एका भ्रमणध्वनीची बॅटरी पूर्ण चार्जीग झाल्यावर 2 तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची 3 टक्के बॅटरी शिल्लक असल्यास किती वेळ बोलू शकेल ?
1) 3 मिनिट
2) 720 सेकंद
3) 216 सेकंद
4) 238 सेवा
90. एका परीक्षाकेंद्रात एका वर्गामध्ये 7 रांगा आहेत असे एकूण 3 वर्गआहेत. एका रांगेत 25 विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी 2 शिक्षक आणि एका वर्गासाठी एक पर्यवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परिक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थितीत आहेत ?
1) 525
2) 546
3) 576
4) 571
91. एका आयाताकृती शेताचे क्षेत्रफळ 460 चौ.मी. आहे. जर त्याची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 5 टक्क्याने जास्त आहे. त्या शेतास तारेचे कुंपन 50 रुपये प्रती मीटर या भावात करावयाचे असल्यास किती खर्च येईल ?
1) 43006
2) 23000
3) 2150
4) 11500
92. 16 संख्यांची सरासरी 19 आहे. प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नविन संख्या संचाची सरासरी काढा.
1) 9
2) 10
3) 9.5
4) 10.5
93. एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती ?
1) 40
2) 45
3) 50
4) 55
94. त्रिवेणीने एका बँकेकडून द.सा.द.शे. 10 टक्के दराने 600 रूपये 3 वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल ?
1)180
2) 200
3) 160
4) 220.
95. एका संख्येच्या 50 टक्क्यांमधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती ?
1) 100
2) 200
3) 300
4) 400
96. A स्थानकावरून B स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची आगगाडी ताशी 50 कि.मी. वेगाने जाते. B स्थानकाकडून A स्थानकाकडे जाणारी 1300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 70 कि.मी. वेगाने जाते. तर त्या दोन्ही आगगाड्या परस्परांना किती वेळेत ओलांडतील ?
1) 120 सेकंदात
2) 20 सेकंद
3) 150 सेकंद
4) 130 सेकंद
97. एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळांची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी 3 तास लागतात तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी 6 तास लागतात. दोन्ही नळ एकच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेला ?
1) 60 मीनीट
2)180 मीनीट
3) 120 मीनीट
4) 150 मीनीट
98. एका समभुज चौकोणचे कर्ण अनुक्रमे 15.6 से.मी. व 9.4 से.मी. लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
1) 73 चौ.सें.मी.
2) 73.20 चौ.से.मी
3) 73.25 चौ.से.मी.
4) 73.32 चौ.से.मी
99. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रु. किंमतीच्या ग्रंथावर 20 टक्के सुट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना या ग्रंथासाठी किती पैसे मोजावे लागले ?
1) 220 रू
2) 230 रू
3) 240रू
4) 250 रू.
100. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो ?
1) 9
2) 10
3) 19
4) 20

उत्तरे
75 – 1, 76 – 3, 77 – 3, 78 – 1,  79 – 3, 80 – 1,
81 – 1, 82 – 2, 83 – 3, 84 – 1, 85 – 3, 86 – 1,
87 – 2, 88 – 3, 89 – 3, 90 – 4, 91 – 1, 92 – 3 ,
93 – 2, 94 – 1, 95 – 2, 96 – 2, 97 – 3, 98 – 4,
99 – 3, 100 – 4

1 COMMENT

Comments are closed.