तांत्रिक प्रश्न 40
Arogya Sevak Question Paper 2015 Part 3
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2015 भाग 3
———————————————————————-
1 ते 60 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
61. त्वचेला काळा रंग कशामुळे येतो ?
(A) अनास्थेशिया (B) मेलॅनीन (C) पेनिसिलीन (D) व्हेगस
62. मानसाच्या शरीरात ——— गुणसुत्रे असतात ?
(A) 46 (B) 23 (C) 33 (D) 12
63. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण प्रति १०० मि.ली. रक्तात किती असते ?
(A) 14 ग्रॅम (B) 16 ग्रॅम (C) 10 ग्रॅम (D) 20 ग्रॅम
64. मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता आहे ?
(A) इंद्रिय (B) उती (C) अवयव संस्था (D) पेशी
65. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते आहे ?
(A) कॅलोरीमिटर (B) मॅग्नोमिटर
(C) स्फिग्मोमॅनोमिटर (D) स्पेक्ट्रोमॅनोमिटर
66. कोणत्या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते ?
(A) काचबिंदू (B) निकदृष्टिता
(C) मोतीबिंदू (D) रातांधळेपणा
67. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो ?
(A) मायकोबॅक्टेरिअम (B) प्लास्झोडीअम
(C) मॅनिंगोकोकस (D) यापैकी नाही
68. ‘मायकोबॅक्टेरिअम’ या जिवाणूंमुळे कोणता आजार होतो ?
(A) क्षय (B) एडस् (C) हिवताप (D) यापैकी नाही
69. पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते ?
(A) कॅन्सर (B) एडस् (C) पोलिओ (D) मलेरिया
70. टायफॉईडचे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात ?
(A) स्वल्पविराम (B) दंडाकृती
(C) त्रिकोणी (D) यापैकी नाही
71. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ कोणत्या साली सुरू झाली ?
(A) 1970 (B) 1972 (C) 1975 (D) 1978
72. जीवनसत्व ‘अ’ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमा अंतर्गत ६ वर्षाखालील मुला-मुलींना दर ………… महिन्याला ‘अ’ जीवनसत्वाचा डोस दिला जातो ?
(A) 3 महिने (B) 6 महिने (C) 12 महिने (D) 18 महिने
73. डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते ?
(A) 20 ते 25% (B) 25 ते 30%
(C) 30 ते 30% (D) 45 ते 50%
74. पालेभाज्यात जीवनसत्व ……… हे कॅरोटिन या द्रव्याच्या स्वरूपात असते ?
(A) ब (B) अ (C) क (D) ड
75. सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते ?
(A) पेरू (B) लिंबू (C) आवळा (D) टोमॅटो
76 कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते ?
(A) हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी
(B) रक्त गोठण्यासाठी
(C) त्वचा चांगली राहण्याकरिता
(D) 1 व 2 बरोबर
77. लोहाच्या कमतरतेमुळे ……… हा रोग होतो ?
(A) गलगंड (B) कॅन्सर (C) रक्तक्षय (D) मलेरिया
78. भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे ?
(A) हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेश
(B) महाराष्ट्र व कर्नाटक
(C) काश्मिर व आसाम (D) गुजरात व मध्य प्रदेश
79. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो ?
(A) मुडदूस (B) रातआंधळेपणा
(C) क्षय (D) मलेरिया
80. खरूज हा ………. चा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो ?
(A) केसाचा (B) त्वचेचा
(C) फुफ्फुसाचा (D) यापैकी नाही
81. डिपीटी या त्रिगुणी लीसमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही ?
(A) घटसर्प (B) डांग्या खोकला (C) हगवण (D) धनुर्वात
82. ब्लीचींग पावडर कशासाठी वापरतात ?
(A) दुर्गंधीनाशक म्हणून
(B) पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी
(C) मलमुत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी
(D) वरील सर्व बरोबर
83. जगातून कोणत्या रोगाचे १००% निर्मूलन झाले आहे ?
(A) मलेरिया (B) प्लेग (C) देवी (D) कॉलरा
84. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला ?
(A) चीन (B) जपान (C) भारत (D) अमेरिका
85. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविले होते ?
(A) 1885 (B) 1990 (C) 1991 (D) 1995
86. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे ?
(A) 1950 (B) 1952 (C) 1955 (D) 1956
87. ‘डॉटस्’ हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जात आहे ?
(A) कुष्ठरोग (B) एडस् (C) क्षयरोग (D) मलेरिया
88. भारताची पहिली महिला डॉक्टर कोण ?
(A) ईरावती कर्वे. (B) डॉ. आनंदीबाई जोशी
(C) डॉ.आनंदीबाई देशपांडे (D) डॉ. आनंदीबाई पटवर्धन
89. राष्ट्रीय एडस् संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
(A) कोलकाता (B) मुंबई (C) बंगळुरू (D) पुणे
90. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
(A) जीवनसत्वे (B) आयोडीन (C) कर्बोदके (D) इन्सुलीन
91. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
(A) पहिला (B) दुसरा (C) तिसरा (D) चौथा
92. शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते ?
(A) पहिली ते चौथी (B) तिसरी ते पाचवी
(C) पाचवी ते सातवी (D) सातवी ते दहावी
93. कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते ?
(A) आरएच+ (B) ओ (C) बी (D) ए
94. मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते ?
(A) 3 (B) 5 (C) 7 (D) 8
95. ‘जागतिक एडस् निर्मूलन दिन’ म्हणून कोणता दिन पाळला जातो ?
(A) 1 नोव्हेंबर (B) 1 जानेवारी
(C) 1 डिसेंबर (D) 1 ऑगस्ट
96. रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो ?
(A) मांजर (B) कुत्रा (C) म्हैस (D) लांडगा
97. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते ?
(A) 10 (B) 12 (C) 7 (D) 9
98. दूरदर्शन पाहतांना ……. ते…….. फुट असे अंतर असावे ?
(A) 3 ते 5 फुट (B) 6 ते 7 फुट
(C) 10 ते 12 फुट (D) 8 ते 9 फुट
99. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली ?
(A) 1945 (B) 1948 (C) 1950 (D) 1956
100. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला ?
(A) आईनस्टाईन. (B) कार्ल बेंझ
(C) कार्ल लँड स्टायनर (D) लुई पाश्चर
उत्तरे
61-B, 62-A, 63-A, 64-D, 65-C,66-C, 67-B, 68-A, 69-C, 70-B, 71-C, 72-B, 73-A, 74-B, 75-C, 76-D,77-C, 78-C, 79-B, 80- B, 81- C, 82-D, 83-C, 84-C, 85-C, 86-C, 87-C, 88-B, 89-D, 90-B, 91-B, 92-A, 93-B, 94-B, 95- C, 96- B, 97-D, 98-B, 99-B, 100-C