जीवशास्त्र भाग 1 : BIOLOGY Part 1

जीवशास्त्र भाग 1 : BIOLOGY Part 1

१) हालचाल, श्वसन, वाढ, चेतनाक्षमता, प्रजनन, उत्सर्जन ही सजीवांची वैशिष्टये आहेत.
२) घडणाऱ्या घटनांना योग्य प्रतिसाद देणे याला ‘चेतनाक्षमता’ असे म्हणतात.
३) स्वतः सारख्याच दुसऱ्या सजीवाला जन्म देणे, याला सजीवांचे प्रजनन किंवा पुनरूत्पादन असे म्हणतात.
४) जगण्यासाठी परिसराशी मिळते जुळते होण्याच्या सजीवांच्या क्षमतेला अनुकूलन असे म्हणतात.
५) मासे कल्ल्यांच्या साहयाने पाण्यात विरघळलेला ऑक्सीजन शरीरामध्ये घेतात.
६) मासे कल्ल्यांच्या साहयाने श्वसन करतात.
७) पंख हे रुपांतर झालेले पक्षांचे पुढचे पाय आहेत.
८) पक्षांची हाडे पोकळ असतात.
९) शॅमेलिऑन सरडा परिसरामप्रमाणे रंग बदलतो.
१०) बियांकुरणासाठी ओलावा, हवा आणि ऊबेची गरज असते.
११) दल, आदिमुळ आणि कोंब यांना एकत्रितपणे गर्भ असे म्हणतात.
१२) बीजांकुरणात आदिमुळापासून मुळ आणि कोंबापासून खोड तयार होते.
१३) शरीरात तयार झालेले निरुपयोगी आणि घातक ठरणारे पदार्थ सजीव उत्सर्जन क्रियेवाटे शरीराबाहेर टाकून देतात.
१४) वनस्पतींचे वर्गीकरण सपुष्प आणि अपुष्प वनस्पती या दोन गटात केले जाते.
१५) सपुष्प वनस्पतींना मुळ, खोड, पाने, फुले हे अवयव असतात.
१६) अपुष्प वनस्पतींना मुळ, खोड, पाने, फुले हे अवयव नसतात.
१७) नेचे ही मुळ, खोड, पाने, फुले हे अवयव असलेली सपुष्प वनस्पती आहे.
१८) कवक, भुछत्र, स्पायरोगायरा इ. मुळ, खोड आणि पान नसलेल्या अपुष्प वनस्पती आहेत.
१९) जलवाहिन्या व रसवाहिन्या असणाऱ्या वनस्पतींना संवहनी वनस्पती असे म्हणतात.
२०) जलवाहिन्या व रसवाहिन्या नसणाऱ्या वनस्पतींना असंवहनी वनस्पती असे म्हणतात.
२१) द्विबीजपत्री (द्विदलिकित) वनस्पतीला सोटमुळ असतात. उदा. गाजर सोटमूळ आहे.
२२) एकबीजपत्री (एकदलिकित) वनस्पतीला आगंतुक व तंतुमय मुळे असतात. उदा. गवत.
२३) वनस्पतींना आधार देणे तसेच जमिनीतील क्षार आणि पाणी शोषून घेणे हे मुळांचे कार्य आहे.
२४) गाजर, बीट, रताळे ही मुळे आहेत.
२५) वडाच्या पारंब्या ही आधार देणारी मुळे आहेत.
२६) कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये भारतातील सर्वात जुने वडाचे झाड आहे.
२७) खोडावर जेथे पाने फुटतात त्या भागाला पेरे असे म्हणतात.
२८) दोन पेऱ्यांमधील खोडाच्या भागाला कांडे असे म्हणतात.
२९) मुकूलापासून फांद्या फुटतात.
३०) मुळांनी शोषलेले क्षारयुक्त पाणी पानांना पुरविणे आणि तयार झालेले अन्न वनस्पतींच्या सर्व भागांना पुरविणे हे खोडाचे कार्य आहे.
३१) वनस्पतींना आधार देणे हेही खोडाचे कार्य आहे.
३२) बटाटा, आले ही अन्नसाठा करणाऱ्या खोडांची उदाहरणे आहेत.
३३) शिरांमुळे पानांना आधारे मिळतो. शिरांमधून पाण्याचे व अन्नाचे वहन होते.
३४) हरीत वनस्पती कार्बनडाय ऑक्साईड व पाणी वापरुन सुर्यप्रकाश आणि हरीत द्रव्यांच्या साहयाने स्वतःचे अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात.
३५) हरितद्रव्य, प्रकाश, पाणी आणि कार्बनडाय ऑक्साईड हे प्रकाश संश्लेषणास आवश्यक घटक आहेत.
३६) प्रकाश संश्लेषणात हरित द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. रासायनिक उर्जेच्या स्वरूपात ही अँडिनोसिन ट्राय फॉस्फेट रेणूत साठवली जाते.
३७) झाडांचे वय खोडांवरील वर्तुळाच्या साहयाने ठरवले जाते.
३८) यिस्टचा उपयोग किण्वन प्रक्रीयेसाठी होतो.
३९) पावावरची बुरशी म्हणजे म्युकर, भुछत्र, पेनिसिलीयम, किण्व म्हणजे यिस्ट, गव्हावरचा तांबेरा ही कवकाची उदाहरणे आहेत.
४०) पारमेलीया म्हणजे मसाल्याचे दगडफुल होय.
४१) दगडफुल ही कवक आणि शैवालाच्या एकत्रित वाढण्याचे तयार होते.
४२) वनस्पती त्यांना लागणारी मुलद्रव्ये हवा, पाणी व जमीन यांच्या माध्यमातून घेत असतात.
४३) वनस्पती नत्र जमिनीतून घेतात.
४४) कॅल्शिअम, पालाश, गंधक, स्फुरद ही द्रव्ये वनस्पती जमिनीतूनच मिळवतात.
४५) वनस्पती कार्बन हवेतील कार्बनडाय ऑक्साईडमधून घेतात.
४६) नत्र, स्फुरद, पालाश ही वनस्पतींची प्रमुख अन्नद्रव्ये आहेत.
४७) कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही वनस्पतींची दुय्यम अन्नद्रव्ये आहेत.

उर्वरित माहिती नंतरच्या पोस्ट मध्ये दिली आहे.

1 COMMENT

Comments are closed.