PUNE MAHANAGARPALIKA PAPER GK 2

सामान्य ज्ञान भाग 2

1) कालबेलिया कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे ?
1. राजस्थान
2. कर्नाटक
3. मध्य प्रदेश
4. हिमाचल प्रदेश

2) मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याची संबंधित आहे ?
1. छत्तीसगड
2. बिहार
3. झारखंड
4. ओडिशा

3) जखमेतील रक्तप्रवाह थांबवण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात ?
1. मोरचूद
2. विरंजक चूर्ण
3. तुरटी
4. वरील सर्व

4) भारताने 2022 मध्ये कोणत्या देशामधून चित्ते आणले आहेत ?
1. दक्षिण आफ्रिका
2. इराण
3. इराक
4. नामिबिया

5) भारतामध्ये सप्टेंबर 2022 मध्ये एकूण किती चित्ते आणले आहेत ?
1. 8
2. 5
3. 9
4. 6

6) सप्टेंबर 2022 मध्ये भारतामध्ये आणलेले चित्ते कोणत्या अभयारण्य मध्ये ठेवले आहेत ?
1. पेंच राष्ट्रीय उद्यान
2. कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान
3. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान
4. कान्हा राष्ट्रीय उद्यान

7) अफगान शासक बाबरने भारतामध्ये . . ………….. मध्ये मुगल सल्तनत ची स्थापना केली होती.
1. इ.स. 1516
2. इ. स. 1536
3. इ. स. 1526
4. इ.स. 1556

8) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ?
1. राजगड
2. पन्हाळा
3. रायरेश्वर
4. शिवनेरी

9) प्राचीन भारतातील थोर योग अभ्यासक पतंजली हे खालीलपैकी कोणाचे समकालीन होते ?
1. पुष्यमित्र शुंग
2. चंद्रगुप्त मौर्य
3. अशोका
4. बिंबिसार

10) अष्टाध्यायी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?
1. पतंजली
2. पाणिनी
3. आर्य चाणक्य
4. कल्हण

11) भारतामधील कोणते राज्य कॉफी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे ?
1. केरळ
2. आंध्र प्रदेश
3. कर्नाटक
4. आसाम

12) ………… ला गोल्डन फायबर या नावाने ओळखले जाते ?
1. रेशिम
2. गांजा
3. कापूस
4. ताग

13) पुढीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही ?
1. राजस्थानी
2. कोकणी
3. मणिपुरी
4. मराठी

14) भारताच्या नागरिकत्वासंबंधीच्या व्यापक तरतुदी कोणत्या कायद्याने करण्यात आल्या ?
1. 1951 चा कायदा
2. 1955 चा कायदा
3. 1947 चा कायदा
4. 1965 चा कायदा

15) भारतीय दंड संहिता केव्हा अस्तित्वात आली ?
1. 1947
2. 1950
3. 1860
4. 1865

16) गोवा भारतीय संघराज्याचा भाग कोणत्या वर्षी बनला ?
1. 1960
2. 1963
3. 1962
4. 1961

17) पृथ्वीराज रासो कोणी लिहिले आहे ?
1. चंदबरदाई
2. अमरसिंह
3. जयसिंग सुरा
4. तुलसीदास

18) पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार कोणी केला ?
1. जैतपाल
2. महादेव यादव
3. रामदेवराय
4. सोमेश्वर

19) बिहार मधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता ?
1. भात
2. ताग
3. नीळ
4. कापूस

20) …………. यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
1. लॉर्ड कर्झन
2. विल्यम वार्ड
3. लॉर्ड लिटन
4. लॉर्ड मेकॉले

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3, 8 – 4,
9 – 1,10 – 2, 11 – 3 ,12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3,
16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3, 20 – 4