RRB GROUP D QUESTIONS 18 AUGUST 2022 ALL SHIFT

RRB GROUP D QUESTION PAPER

18 August 2022

तिन्ही शिफ्टचे प्रश्न

1. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव हा नारा दिला होता ?
पाचव्या ( पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिला होता )

2. 1950 साली सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश सोडून इतर किती न्यायाधीश होते ?
7

3. 1 अश्वशक्ती = …………. वॅट
746

4. मूलभूत कर्तव्यांची माहिती कोणत्या कलमामध्ये दिली आहे ?
51 अ

5. दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट कोण प्रकाशित करते ?
अर्थ मंत्रालय

6. ब्लिचिंग पावडरचे रासायनिक सूत्र काय आहे ?
Ca ( OCL )2 – Calcium Hypochlorite

7. मिशन इंद्रधनुष्य सर्वप्रथम किती राज्यांमध्ये सुरु करण्यात आले ?
11

8. वायु स्वास्थ सेवा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
ओडिसा

9. भारत व कोणत्या देशा दरम्यान असलेल्या तीस वर्षापासूनच्या राजनैतिक संबंधावर आधारित एक स्मारक लोगो तयार करण्यात आला आहे ?
इस्त्रायल

10. पंकज अडवाणी यांनी आशियाई बिलियर्ड 2022 या स्पर्धेत कोणाचा पराभव करून ती स्पर्धा जिंकली होती ?
ध्रुव सितवाला

11. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित किती भाषांची माहिती दिली आहे ?
22

12. लोसर उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो ?
लडाख

13. इस्लाम धर्माची स्थापना कोणी केली ?
मोहम्मद पैगंबर

14. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणा संदर्भात त्रिके चा नियम कोणी सांगितला ?
डोबेरायनर

15. भारतातील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोणते आहे ?
तुतीकोरीन

16. व्यक्तिगत स्वातंत्र्याची संबंधी भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे ?
21

17. कॅल्शियम सल्फेट हेमीहाइड्रेट चे व्यावहारिक नाव काय आहे ?
प्लास्टर ऑफ पॅरिस

18. Ketone फॅमिलीचे पहिले आणि दुसरे संयुग कोणते आहे ?
प्रोपेनोन आणि ब्यूटेनोन

19. ओरल कॉण्ट्रासेप्टिव पिल्स कशासाठी वापरतात ?
गर्भ धारणा होऊ नये यासाठी.

20. मेंडेलीव्हने आवर्त सारणी मध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले ?
मूलद्रव्यांचा अणुभारांक

21. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन पाणी तयार होते ती कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे ?
संयोगी रासायनिक अभिक्रिया

22. मुघलांनी स्थापन केलेले पहिले आधुनिक शहर कोणते आहे ?
फत्तेपूर शिक्री

23. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती ?
राजा राममोहन राय

24. 75 वी संतोष ट्रॉफी कोणत्या राज्याने जिंकली आहे ?
केरळ

25. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रांमध्ये दिला जातो ?
विज्ञान संशोधन ( वैज्ञानिक )

26. निती आयोगाने तयार केलेल्या गरिबी निर्देशांक 2021 नुसार भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे ?
बिहार

27. 2022 पर्यंत भारतातील कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही ?
नागालँड, मिझोरम, मेघालय या तीन राज्यात नाही.

28. आशियाई सिंह भारतामधील कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळतात ?
गुजरात

29. बर्मिंगहॅम बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल कोणी जिंकले ?
पी. वी. सिंधू

30. भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
राजीव कुमार

31. 2022 साली भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत ?
गिरीश चंद्र मुर्मू

32. एका क्वाईलमध्ये 6 टर्न दिले आहेत. ती क्वाईल एक टर्न असलेल्या क्वाईलच्या तुलने किती पट मॅग्नेटिक फिल्ड तयार करेल ?
6 पट

33. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे ?
वन संवर्धन

34. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती ?
स्वामी विवेकानंद

35. भारताने पहिला प्रजासत्ताक दिवस कोणत्या वर्षी साजरा केला ?
1950

36. पुढीलपैकी कोणता अवयव उत्सर्जन संस्थेची संबंधित आहे ?
वृक्क, मूत्र वाहिनी, मूत्राशय, मूत्रमार्ग उत्सर्जन संस्थेशी संबंधित आहेत.

37. बंधन बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
2001

38. भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती अनुसूची आहेत ?
12

39. बॅड कोलेस्ट्रॉल कोणते आहे ?
LDL

40. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड पाणांमध्ये कशाच्या साह्याने शोषून घेतात ?
पर्णरंध्र